मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

रात्रभर अभ्यास करण्याचा विचार करताय? 'या' टिप्सचा करा वापर; कधीच येणार नाही झोप

रात्रभर अभ्यास करण्याचा विचार करताय? 'या' टिप्सचा करा वापर; कधीच येणार नाही झोप

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला रात्रीच्या वेळी अभ्यास करताना कधीच झोप येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया.

    मुंबई, 15 ऑगस्ट: कुठलीही परीक्षा म्हंटलं तर अभ्यास महत्त्वाचा असतो. MPSC किंवा UPSC (MPSC and UPSC Preparation) या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी अगदी जीवाचं रान करतात. दिवसातून अठरा ते वीस तास अभ्यास करतात. अनेक विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी (How to do Late night studies) जागून अभ्यास करायला आवडतं. सकाळी अभ्यास करण्यापेक्षा रात्री चांगल्या पद्धतीनं (Tips to Avoid Sleep while studying) अभ्यास होतो आणि उत्तरं लक्षात राहतात असंही काही विद्यार्थी सांगतात. मात्र रात्रीचा अभ्यास म्हंटलं की झोप येते. झोपेमुळे अभ्यास होत नाही. आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला रात्रीच्या वेळी अभ्यास करताना कधीच झोप येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया. रात्री उशिरापर्यंत राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शक्य असल्यास दुपारी थोडी झोप घ्या.. जेणेकरून तुम्ही रात्री अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला झोप येणार नाही आणि अभ्यास चांगला होईल. जर तुम्ही रात्री फक्त स्टडी लॅम्प लावून अभ्यास केला आणि बाकीच्या खोलीत अंधार असेल तर यामुळे तुम्हाला झोप येईल.  म्हणूनच शक्य झाल्यास संपूर्ण खोलीत मोठा लाईट लावा. ज्यामुळे तुम्ही जागे राहू शकाल आणि झोप येणार नाही. हे वाचा - बारावीनंतर टॉप कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवायचाय? मग या स्कॉलरशिप परीक्षा नक्की द्या अभ्यास करताना बेडवर लेटून किंवा झोपून अभ्यास करू नका. यामुळे तुम्हाला झोप येऊ शकते. त्यामुळे शक्य असल्यास खुर्ची-टेबलवर सरळ बसून अभ्यास करा. अभ्यास करताना नेहमी शांत वातावरणात अभ्यास करा. अभ्यास करताना गाणे ऐकू नका. गाणं ऐकताना झोप येण्याची शक्यता असते. रात्री अभ्यास करताना पाठांतर करू नका. याऐवजी गणिताचा अभ्यास करा. यामुळे तुमचा मेंदू सतर्क राहील आणि झोप येणार नाही.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या