मुंबई, 14 ऑगस्ट: राज्यात बारावीचा निकाल काही दिवसांआधी जाहीर आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश (After 12th Admission) घेण्यासाठी लगबग सुरु आहे. कोणती शाखा आणि कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. आपल्या पाल्यांना चांगलं कॉलेज (Best colleges after 12th) मिळावं यासाठी पालखी प्रयत्न करत आहेत. मात्र अशा काही स्कॉलरशिप्स आहेत ज्यांची परीक्षा देऊन तुम्ही फार कमी शुल्कात चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवू शकता. अशाच काही स्कॉलरशिप्स (Best scholarships after 12th) आणि त्यांच्या आवेदन पद्धतीबाबत आज आम्ही सांगणार आहोत.
कॉलेज अॅडमिशन स्कॉलरशिप अॅडमिशन (CASA)
कॉलेज अॅडमिशन स्कॉलरशिप अॅडमिशन (CASA) 12 वी नंतर एक लोकप्रिय शिष्यवृत्ती परीक्षा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना 100% पर्यंत स्कॉलरशिप मिळू शकते. CASA अर्ज प्रक्रिया साधारणतः जूनमध्ये सुरू होते आणि या शिष्यवृत्तीसाठी कोणतंही अर्ज शुल्क लागत नाही. सीबीएसई, आयसीएसई किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त राज्य मंडळाकडून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्ससाठी फॉर्म भरू शकतात. या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करण्यासाठी सुरुवातीला अधिकृत वेबसाइटद्वारे CASA मध्ये नोंदणी करा. यानंतर दिलेल्या सूचनांचं अनुसरण करा आणि अर्ज भरा. यानंतर आवश्यक कागदपत्रं अपलोड करा अर्ज केल्यानंतर तुम्हाला SMS द्वारे संपूर्ण अर्जाची माहिती मिळेल.
हे वाचा - महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी इथे विविध पदांसाठी पदभरती; इथे करा अर्ज
डॉ एपीजे अब्दुल कलाम इग्नाइट अवॉर्ड्स
नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन डॉ.एपीजे अब्दुल कलाम इग्नाइट (Dr. APJ Abdul Kalam Ignite Awards) पुरस्कारांचे आयोजन करतं. बारावीनंतर आणि बारावीपर्यंतचे विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी आपले विचार टेक्स्टमध्ये लिहा आणि अधिकृत वेबसाइटवर ईमेल करा. नोंदणीची शेवटची तारीख साधारणपणे दरवर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात असते. या स्कॉलरशिपसाठी उमेदवारांचं कमाल वय 17-18 वर्षे दरम्यान असावं.
पीएम नरेंद्र मोदी स्कॉलरशिप
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Scholarship) यांनी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विविध पदवी आणि पदव्युत्तर कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी शिष्यवृत्ती सुरू केली. ही योजना माजी सैनिकांच्या मुलांना आर्थिक सहाय्य देखील प्रदान करते. हे B.Tech/B.E., B.A, BBA, BCA, M.A, M.Com, M.Sc, PhD, Pharmacy आणि Medical अभ्यासक्रमांसाठी 5,500 शिष्यवृत्ती देते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Exam, Scholarship