Home /News /career /

तरुणींनो, एअर होस्टेस बनण्याचं स्वप्न बघताय? मग अंगी 'हे' गुण असणं महत्त्वाचं

तरुणींनो, एअर होस्टेस बनण्याचं स्वप्न बघताय? मग अंगी 'हे' गुण असणं महत्त्वाचं

एअर होस्टेस होण्यासाठी शिक्षणासोबतच तुमच्या अंगी कोणते गुण असायला हवेत याबाबत तुम्हाला सांगणार आहोत.

    मुंबई, 04 जुलै:  भारतात अनेक तरुणीचं एअर होस्टेस (Air Hostess jobs) बनण्याचं स्वप्नं असतं. विमानात किंवा विमानतळावर (Airport) प्रवाशांची मदत करण्याचं काम एअर होस्टेस (Air Hostess) करतात. एअर होस्टेसच्या जॉब्सला एक वेगळंच ग्लॅमर प्राप्त आहे. मात्र अनेक तरुणींना एअर होस्टेस होण्यासाठी नक्की काय शिक्षण घ्यावं किंवा यात करिअरच्या (Career as Air Hostess) संधी काय आहेत याबद्दल माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला एअर होस्टेस होण्यासाठी शिक्षणासोबतच तुमच्या अंगी कोणते गुण असायला हवेत याबाबत तुम्हाला सांगणार आहोत. शैक्षणिक पात्रता एअर होस्टेस ट्रेनिंगसाठी एअर इंडिया (Air India) आणि इंडियन एअरलाईन्ससारख्या कंपन्या 18 ते 25 वयोगटातील तरुण मुलींची भरती करतात आणि त्यांची उंची किमान 157.5 सेमीअसणं महत्त्वाचं आहे. बहुतांश संस्थांमध्ये शिकण्यासाठी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. परंतु काही संस्था डिग्रीनंतरच एअर होस्टेसचं शिक्षण देतात. अंगी हे गुण असणं आवश्यक स्मार्टनेस आणि आत्मविश्वास असणं महत्त्वाचं. आकर्षक आणि नम्र पर्सनॅलिटी बोलण्याची उत्तम क्षमता इंग्रजी किंवा एखादी विदेशी भाषा येणं महत्त्वाचं. हे वाचा - परदेशात शिक्षणासाठी हे आहेत बेस्ट कोर्सेस; बघा कोणत्या देशात कुठला कोर्स चांगला हे आहेत टॉप कॉलेजेस वायएमसीए, नवी दिल्ली स्कायलाइन शैक्षणिक संस्था, हौज खास, दिल्ली फ्रँकफिन इंस्टिट्यूट ऑफ एअर होस्टेस ट्रेनिंग, नवी दिल्ली करिअरच्या संधी एअर होस्टेस प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर एअर इंडिया (Air India), इंडिगो (Indigo), ब्रिटीश एअरवेज (British Airways) इत्यादी विविध सार्वजनिक आणि खासगी विमान कंपन्यांमध्ये नोकर्‍या मिळू शकतात.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Advice, Airport, Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या