मराठी बातम्या /बातम्या /करिअर /तुमच्यातही गूढ गोष्टींचा शोध घेण्याची जिद्द आहे का? मग 'क्रिमिनॉलॉजी'मध्ये करा करिअर; जाणून घ्या

तुमच्यातही गूढ गोष्टींचा शोध घेण्याची जिद्द आहे का? मग 'क्रिमिनॉलॉजी'मध्ये करा करिअर; जाणून घ्या

गुन्ह्यांशी निगडित असलेल्या 'क्रिमिनॉलॉजी'मध्ये आहे करिअरची संधी

गुन्ह्यांशी निगडित असलेल्या 'क्रिमिनॉलॉजी'मध्ये आहे करिअरची संधी

गुन्ह्यांशी निगडित असलेल्या 'क्रिमिनॉलॉजी'मध्ये आहे करिअरची संधी

मुंबई, 23 जून :   देशात सध्या गुन्हेगारीचं (Crimes in India) प्रमाण प्रचंड वेगानं वाढत चाललं आहे. अशातच CID किंवा गुन्ह्यांशी निगडित सीरिअल्समधून पोलीस (Police) गुन्हेगारापर्यंत कशा रीतीनं पोहोचतात आणि त्याला धडा शिकवतात हे बघून लहान मुलंच काय तर मोठेही आकर्षित होतात. मला मोठं होऊन पोलीस व्हायचंय आणि गुन्हेगारांना धडा शिकवायचाय अशी इच्छा काही लहान मुलं बोलून दाखवतात. तसंच काहींना गूढ गोष्टी शोधून काढण्यात किंवा त्या गोष्टीच्या तळाशी जाऊन चौकशी करण्यात रस असतो. जर तुम्हालाही अशा प्रकारची आवड असेल तर तुम्ही  'क्रिमिनॉलॉजी'मध्ये करिअर (Career in Criminology) करू शकता. आता हे नक्की आहे तरी काय? चला तर मग जाणून घेऊया.

क्रिमिनॉलॉजी (Criminology) म्हणजे नक्की काय?

गुन्ह्यांशी निगडित असलेला हा एक कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर आपल्याला गुन्ह्यांशी निगडित सरकारी (Government jobs) किंवा खासगी (Private jobs) संस्थांमध्ये जॉब मिळू शकतो,. अनेकदा गुन्ह्यातील (Crimes) रहस्यमय बाबींचा उलगडा करावा लागतो. बऱ्याचदा गंभीर गुन्ह्यातील प्रकरणांना सामोरं जावं लागतं ते भयावह असण्याची शक्यता असते. काही घटना गंभीर असतात अशावेळी मानसिक संतुलन नीट ठेवून काम करावं लागतं.

हे वाचा -आता करिअरमध्ये बिनधास्त जपा कलेची आवड; जाणून घ्या काय आहे Product Designing

हे शिक्षण महत्त्वाचं  

क्रिमिनॉलॉजी (Criminology) या क्षेत्रात करिअर करण्यासाठी किमान बारावी पास असणं आवश्यक आहे. या विषयात पदवीही घेता येते त्याचा कालावधी तीन वर्षाचा असतो. तसंच पदवीनंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करता येतं. BA किंवा Bsc तसंच MA किंवा Msc in Criminology हे अभ्यासक्रम प्रचलित आहेत. तसंच Post Graduate Diploma in Criminology हा एक वर्षाचा कोर्स करता येतो.

करिअरच्या संधी

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर क्राईम इंटेलीजन्स अॅनालीस्ट (Crime Intelligence Analyst) , लॉ रीफार्म रिसर्चर (Law Reform Researcher), कम्युनिटी करेक्शन कोऑर्डीनेटर (Community correction coordinator), ड्रग्स पॉलीसी अॅडव्हायजर (Drugs policy Adviser) या पदावर काम करता येतं. तसंच  डीटेक्टीव एजन्सी (Detective agency) मध्येही काम करता येतं.

हे आहेत टॉप इन्स्टिट्यूट्स

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ क्रिमिनॉलॉजी अँड फोरेंसिक सायन्स, दिल्ली (National Institute of Criminology and Forensic Science)

इंस्टीट्यूट ऑफ क्रिमिनॉलॉजी अँड फोरेंसिक सायन्स, नवी दिल्ली (Institute of Criminology and Forensic Science, New Delhi)

ब्यूरो ऑफ पुलिस रिसर्च अँड डेवलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर, नवी दिल्ली ( Bureau of Police Research & Development, New Delhi)

डिपार्टमेंट ऑफ क्रिमिनॉलॉजी अँड फोरेंसिक सायन्स, कर्नाटक विद्यापीठ (Department of Criminology and Forensic Science, Karnatak University, Dharwad)

First published:
top videos

    Tags: Career, Crime, Jobs