मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Documents for Admission: विद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक; आताच बघा

Documents for Admission: विद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक; आताच बघा

चला तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दल.

चला तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दल.

चला तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दल.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 31 जुलै: कोरोनामुळे न झालेल्या दहावी आणि बारावी परीक्षांचे (10th 12th exams) निकाल लागत आहेत. महाराष्ट्र्र बोर्डाचा दहावीचा निकाल (Class 10th Results) काही दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे तर लवकरच बारावीचा निकालही (MH 12th Result 2021 date) लागणार आहे. तसंच CBSE चा बारावीचा निकाल (CBSE 12th Result) जाहीर झाला आहे. मात्र आता लगबग आहे ती विद्यार्थ्यांच्या कॉलेजमधील प्रवेशाची. अकरावी प्रवेशसाठी CET (11th Admission CET) परीक्षा घेण्यात येणार आहे मात्र बारावीनंतर प्रवेशासाठी विविध शाखांमध्ये प्रवेश सुरु होणार आहे. मात्र कॉलेजमध्ये प्रवेश (College Admision) घेण्यासाठी अनेक कागदपत्रं (Important Documents for college Admissions) द्यावी लागतात. ही कागदपत्रं नेमकी कोणती? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दल.

बारावीनंतर प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रं

बारावीची ओरिजनल मार्कशीट (12th class Marksheet).

बारावी उत्तीर्ण झाल्याचं सर्टिफिकेट (12th class passing certificate).

कॅरेक्टर सर्टिफिकेट (Character Certificate issued by school)

लिव्हिंग सर्टिफिकेट (School Leaving certificate)

दहावीची मार्कशीट (10th Class marksheet.)

घरच्या पत्त्याचा पुरावा किंवा डोमेसीएल सर्टफिकेट (Resident Certificate/Domicile)

जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC Certificate if you belongs to any minority caste.)

आधार कार्ड (Aadhar Card.)

पॅन कार्ड (Pan Card)

पासपोर्ट फोटो (Passport size Photo)

हे वाचा - HSC Results 2021: 12 वीच्या विद्यार्थ्यांनो, असा चेक करा तुमचा रोल नंबर

दहावीनंतर प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रं

दहावीची मार्कशीट (10th Class marksheet)

दहावीचा डिप्लोमा (10th Class Diploma)

लिव्हिंग सर्टिफिकेट (School Leaving certificate)

घरच्या पत्त्याचा पुरावा किंवा डोमेसीएल सर्टफिकेट(Resident Certificate/Domicile)

जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC Certificate if you belongs to any minority caste.)

आधार कार्ड (Aadhar Card.)

पॅन कार्ड (Pan Card)

पासपोर्ट फोटो (Passport size Photo)

तसंच वरील सर्व कागपत्रांच्या झेरॉक्सचे काही सेट्सही स्वतःजवळ ठेवा म्हणजे तुम्हाला वेळेवर धावाधाव करावी लागणार नाही.

First published: