जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / जॉब मिळत नाहीये? मोबाईलमधील FB, Insta वर नाही तर या Apps वर घालवा वेळ; लगेच मिळेल नोकरी

जॉब मिळत नाहीये? मोबाईलमधील FB, Insta वर नाही तर या Apps वर घालवा वेळ; लगेच मिळेल नोकरी

FB, Insta वर नाही तर या Apps वर घालवा वेळ

FB, Insta वर नाही तर या Apps वर घालवा वेळ

आज आम्ही तुम्हाला अशा काही टॉप वेबसाईट्स आणि Apps सांगणार आहोत ज्यांचा उपयोग करून तुम्हाला लगेच नोकरी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 जानेवारी: देशात बेरोजगारीचा दर वाढतच चालला आहे. डिसेंबर महिन्यात मागील १सोळा महिन्यांमधील सर्वात जास्त बेरोजगारीची नोंद झाली आहे. अनेक तरुणांना जॉब शोधण्या अडचणी येत आहेत. काही कर्मचाऱ्यांना नोकरी मिळण्यात अडचणी येत आहेत. कंपन्यांमध्ये जाऊन CV देऊन झाले, ओळखीच्या व्यक्तींशी बोलूनही झालं पण काहीच उपयोग होत नाही. नक्की नोकरी शोधणार कशी? हाच प्रश्न तुमच्यासमोरही असेल तर चिंता करू नका. मोबाईलमधील इंस्टाग्राम आणि फेसबुकवर जास्त वेळ घालवण्यापेक्षा या अप्लिकेशन्सवर वेळ घालवाल तर नक्कीच जॉब मिळेल. आज आम्ही तुम्हाला अशा काही टॉप वेबसाईट्स आणि Apps सांगणार आहोत ज्यांचा उपयोग करून तुम्हाला लगेच नोकरी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया. गॅज्युएट्ससाठी जॉबची बंपर लॉटरी; महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; करा अप्लाय LinkedIn LinkedIn हे अप्लिकेशन अनेकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे वाटू शकतं. मात्र LinkedIn असं अजिबात नाही. इथे जॉब शोधण्याच्या सोबतच तुम्ही काम करू इच्छिणाऱ्या कामाच्या मोठ्या पदावरच्या व्यक्तींबरोबर संवाद साधता येतो. तसंच इथे निरनिराळ्या कंपन्या जॉब्स पोस्ट करत असतात. त्यामुळे इथे जाऊन तुम्हाला जॉबसाठी अप्लाय करणं सोपं असतं. तसंच तुमच्यातील काही स्पेशल स्किल्स, तुमचं शिक्षण याबद्दल तुम्ही अपडेट करत राहू शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार चांगला जॉब मिळू शकेल. JOB ALERT: फक्त मुंबई-पुणेच नाही तर तुमच्या शहरांमध्येही आहेत बंपर जॉब ओपनिंग्स; इथे बघा लेटेस्ट जॉब्स Naukari.com Naukari.com ही एक स्वतंत्र जॉब सर्चिंग वेबसाईट आहे तसंच या वेबसाईटची अप्लिकेशनही उपलब्ध आहे. इयथे जगभरातील जॉब्स पोस्ट होत असतात. त्यामुळे तुम्हाला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात नोकरी हवी असेल तर मिळू शकते. विशेष म्हणजे इथे तुमच्या शिक्षणानुसार आणि जॉब टायटलनुसार नोकरी शोधण्याची मुभा असते. त्यास्तही तुंहाला तुमचा ई-मेल आयडी आणि संपूर्ण बायोडेटा इथे अपलोड करावा लागतो. यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यास सुरुवात होते. Maharashtra Fire Department Bharti: पात्रता 12वी आणि 69,100 रुपये पगार; एकही परीक्षा नाही; थेट होणार मुलाखत Indeed Naukari.com प्रमाणेच Indeed हे सुद्धा जॉब सर्चिंग अप्लिकेशन आहे ज्यामध्ये तुम्ही सोप्या पद्धतीनं जॉब्स शोधू शकता. तुमचा बायोडेटा अपलोड केल्यानंतर तुमच्यातील स्किल्सनुसार तुम्हाला जॉब्सच्या नोटिफिकेशन्स मिळतात. एकदा जॉबसाठी अप्लाय केल्यानंतर तुमची अप्लिकेशन आवडल्यास कंपनीकडून तुम्हाला मुलाखतीचा कॉल येतो. ही एक वापरण्यास सोपी अशी अप्लिकेशन आहे.

News18लोकमत
News18लोकमत

Monster.com Monster.com ही जॉब सर्चिंग वेबसाईट अप्लिकेशन आहे. इथे तुम्हाला सरकारी आणि खासगी असे दोनही प्रकारचे जॉब्स बघायला मिळतात. इथेही आपला बायोडेटा अपलोड करून तुम्ही जॉबचे नोटिफिकेशन्स मिळवू शकता. वरील काही वेबसाईट्स आणि अप्लिकेशन्सवर रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावं लागू शकतं. त्यामुळे उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करताना काळजीपूर्वक रजिस्टर करावं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात