मराठी बातम्या /बातम्या /करिअर /IMP: शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करताय? आधी 'या' परीक्षा नक्की द्या; होईल फायदा

IMP: शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करताय? आधी 'या' परीक्षा नक्की द्या; होईल फायदा

काळजी करू नका. या परीक्षांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काळजी करू नका. या परीक्षांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काळजी करू नका. या परीक्षांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मुंबई, 24 जून : आजकाल शिक्षणासाठी परदेशात (Study in Abroad) जाण्याचा ट्रेंड भारतात आला आहे. अनेक विद्यार्थी पदवीपर्यंत (Degree education) शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी परदेशात (Foreign Education) जाण्याची इच्छा व्यक्त करतात. मात्र दोन गोष्टींमुळे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. यातील पहिली गोष्ट म्हणजे पैसे आणि दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षा न देणं. परदेशात शिक्षणासाठी (Opportunity Study in Abroad) जाताना काही परीक्षा देण्याची गरज असते. या रिक्षा दिल्यानंतर पुढील शिक्षण सोयीचं होतं. मात्र काही विद्यार्थ्यांना या परीक्षांबाबत (Important tests for Study in Abroad) माहितीच नसतं. काळजी करू नका. या परीक्षांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

The Graduate Record Examination (GRE)

ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासोबतच संशोधन (Education and Research) करण्यासाठी जायचं आहे अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागते. यामध्ये विद्यार्थ्यांची मॅथेमॅटिकल आणि अनॅलिटीकल स्किल्सची (Analytical skills) परीक्षा घेतली जाते.

Test of English as a Foreign Language (TOEFL)

जर तुम्ही अमेरिकेत शिकण्याचा (Higher Study in America) विचार करत असाल सर्व एज्युकेशनल प्रोग्रामसाठी (Educational Program in Abroad) ही परीक्षा आवश्यक आहे. यासह यात विद्यार्थ्यांच्या इंग्रजीची परीक्षा घेतली जाते. जगभरातील तब्बल 125 देशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे.

हे वाचा - गूढ गोष्टींचा शोध घेण्याची जिद्द आहे का? मग 'क्रिमिनॉलॉजी'मध्ये करा करिअर

International English Language Testing System ((IELTS)

ही परीक्षा इंग्रजी भाषेची आहे. जर तुम्ही UK, कॅनडा (Canada), ऑस्ट्रेलिया (Australia) ,न्यूझीलंडमध्ये (New Zealand) शिकण्याचा विचार करत असाल तर ही परीक्षा पास करणं आवश्यक आहे. काही देशांमध्ये ही परीक्षा दिल्याशिवाय तुम्हाला Visa मिळणार नाही.

Test of spoken English (TSE)

ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे त्यांना ही परीक्षा पास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच ज्यांना अमेरिकेत (Study in USA) शिक्षणासोबतच शिकवण्यासाठी जायची इच्छा असेल त्यांच्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे.

The Graduate Management Admission Test (GMAT)

जर तुम्हाला परदेशात जाऊन मॅनेजमेंट (Management studies in Abroad) विषयांमध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर ही परीक्षा महत्त्वाची आहे. जगभरातील तब्बल आठशेहुन अधिक कॉलेजेसमध्ये या परीक्षांचे मार्क्स विचारण्यात येतात.

First published:

Tags: Education, Job alert, Student