• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Exam Tips: कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना कधीही करू नका 'या' चुका; अन्यथा होईल मोठं नुकसान

Exam Tips: कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना कधीही करू नका 'या' चुका; अन्यथा होईल मोठं नुकसान

परीक्षेच्या अभ्यासादरम्यान ज्या चुका होतात त्या कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर: आपल्या अभ्यासादरम्यान अनेक वेळा आपण अशा काही चुका करतो, ज्या आपल्याला लक्षातही येत नाहीत (Mistakes to avoid in exam). पण या चुका नंतर खूप महागात पडतात. स्पर्धात्मक परीक्षा (Competitive exam Preparation Tips) असो की बोर्डाच्या परीक्षा तुम्ही नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. परीक्षेच्या अभ्यासादरम्यान ज्या चुका होतात त्या कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. तुम्ही अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, पण त्यात यश मिळवता येत नसेल, तर आता तुम्हाला तुमची रणनीती थोडी बदलण्याची गरज आहे. तुमची अभ्यासाची पद्धत बदलून तुम्ही कोणत्याही परीक्षेत सहज यश मिळवू शकता (Exam Preparation Tips). कोणत्याही परीक्षेत कामी येतील टिप्स शाळा असो, कॉलेज असो किंवा स्पर्धा परीक्षा, त्यांच्या तयारीदरम्यान काही सामान्य टिप्स पाळल्या पाहिजेत. यामुळे तुम्ही तणावमुक्त राहाल आणि कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवू शकाल. जाणून घ्या प्रत्येक परीक्षेत कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी फ्रेश माईंडनी अभ्यास करा बहुतांश विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतात आणि सकाळी उशिरा उठतात. अशा परिस्थितीत त्यांचा दिवसभराचा दिनक्रम बिघडतो. अभ्यासासोबतच उत्तम आरोग्य आणि फिटनेसही महत्त्वाचा आहे. जर तुम्ही निरोगी नसाल तर तुम्हाला नीट अभ्यास करता येणार नाही. Career in AI: आर्टिफिशियल इंटॅलिजन्सचं वाढतंय महत्त्वं; बघा करिअरच्या संधी अभ्यासाच्या वेळी टेन्शन घेऊ नका बराच वेळ तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण पडतो. जेव्हाही अभ्यास करा तेव्हा तणावमुक्त राहा. टेन्शन घेऊन अभ्यास केलात तर त्यावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. मागील वर्षीचे पेपर्स सोडवून बघा बहुतेक विद्यार्थी परीक्षेपूर्वी मागील वर्षांचे पेपर्स पाहत नाहीत. कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मागील वर्षाचे पेपर सोडवणे महत्त्वाचे आहे. मागील वर्षांच्या पेपर्सवरून परीक्षेचा पॅटर्न आणि प्रश्नांचा सहज अंदाज लावता येतो. काही वेळा मागील वर्षाचे पेपरही रिपीट केले जातात.
  Published by:Atharva Mahankal
  First published: