• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Career in AI: जगात आर्टिफिशिअल इंटॅलिजन्सचं वाढतंय महत्त्वं; जाणून घ्या या क्षेत्रातील करिअरच्या संधी

Career in AI: जगात आर्टिफिशिअल इंटॅलिजन्सचं वाढतंय महत्त्वं; जाणून घ्या या क्षेत्रातील करिअरच्या संधी

तुम्हीही भरघोस पगाराची नोकरी करू इच्छित असाल तर AI (Career scope in AI) हे क्षेत्र फक्त तुमच्यासाठी आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर: कोरोनाच्या काळापासून देशात आणि परदेशात करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ लागल्या आहेत (Career tips). आता बर्‍याच गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (career in Artificial Intelligence) नोकऱ्यांवर अवलंबून आहेत. जर तुम्ही आयटी क्षेत्रातील (Career in IT Sector) नवीन क्षेत्रात करिअरचा मार्ग शोधत असाल, तर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स (Artificial Intelligence course online) करून तुमचे भविष्य उज्ज्वल करू शकता. भविष्यात या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. तसेच या क्षेत्रात अनेक रोजगाराच्या उत्तम संधी (Jobs after Artificial Intelligence course)आहेत. जर तुम्हीही भरघोस पगाराची नोकरी करू इच्छित असाल तर AI (Career scope in AI) हे क्षेत्र फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर मग जाणून घेऊया यातील करिअरच्या संधी. दरवर्षी आयटी क्षेत्रात काहीतरी नवीन घडते. या क्षेत्रात नेहमीच मोठ्या प्रमाणात नोकऱ्या असतात. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील नोकऱ्यांची मागणी खूप वाढली आहे. इंटरनॅशनल एजन्सी गार्टरच्या अहवालानुसार येत्या काळात या तंत्रज्ञानाद्वारे 40 टक्के काम केले जाणार आहे. यात मशीन लर्निंग कोर्ससह रोबोटिक सायन्ससारख्या क्षेत्रांचाही समावेश आहे. कोरोनाच्या कालावधीनंतर मॅन पॉवरऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अवलंबित्व वाढलं आहे. म्हणजेच त्याची व्याप्ती वाढली आहे. अभियांत्रिकी क्षेत्राच्या तुलनेत यामध्ये कमी स्पर्धा आहे. आगामी काळात आयटी, फायनान्स, सिक्युरिटी, डेटा कलेक्शन यासह अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी वाढणार आहेत. AI शिकण्यासाठी कोणते गुण असणं आवश्यक आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स करण्यासाठी संगणक आणि गणित विषय अनिवार्य आहेत. कॉम्प्युटर सायन्सचे पदवीधर उमेदवारही या क्षेत्रात काम करू शकतात. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाद्वारे सॉफ्टवेअर अॅनालिटिक्स, रोबोटिक्स, प्रोग्रामर, गेमिंग क्षेत्रात नोकऱ्या मिळू शकतात. Education Loan : शैक्षणिक कर्ज कसं घ्यायचं? कागदपत्र काय लागतात? वाचा सर्वकाही हे कोर्सेस करणं महत्त्वाचं (Top courses in AI) कॉम्प्युटर सायन्स, आयटी, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्राम, पीजी प्रोग्राम इन मशीन लर्निंग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर करण्यासाठी मुख्य कोर्स आहेत. गुगल, फेसबुक आणि लिंक्डइनसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. येथे रोजगाराच्या अनेक संधी आहेत. स्मार्टफोनच्या धर्तीवर प्रत्येक उपकरण चालवण्यासाठी आता या फील्डची गरज आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: