मुंबई, 11 जुलै: नोकरी शोधण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला काय करायचं आहे हे एका कागदावर लिहून (Note down what you want to do) काढा. तसंच, तुम्हाला कंपनीला तुमची गोष्ट कशा प्रकारे सांगायची आहे आणि तुम्ही स्वतःला कशा प्रकारे सादर करता (How you present yourself) हेदेखील लक्षात घेणं गरजेचं आहे. हा कागदच तुमची संपूर्ण स्टोरी सांगणार आहे. यापुढचा टप्पा म्हणजे, एक प्रभावी आणि योग्य असा रिझ्युम (How to make effective resume) तयार करणं. हा रिझ्युम म्हणजे जगाला सांगण्यासाठी असलेला तुमचा स्टोरीबोर्ड ठरेल. तुमचा रिझ्युम तीन भागांमध्ये विभागणं (Divide resume in three parts) गरजेचं आहे. तसंच, केवळ एका पानाचा रिझ्युम असल्यास उत्तम. तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांनुसार वेगवेगळे रिझ्युम (Make multiple resumes for different companies) तयार करू शकता. जेणेकरून त्या-त्या कंपनीनुसार तुमची कौशल्यं आणि उद्दिष्टं ठळक करता येतील. बिझनेस स्कूल्समध्ये ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे. जगातील कोणताही जॉब मिळवणासाठी मानसिकता सर्वाधिक महत्त्वाची; पॉझिटिव्ह असाल तर लगेच मिळेल जॉब
तुमच्या रिझ्युमचे असे तीन भाग करा :
1. दोन-तीन ओळींमध्ये तुमची माहिती आणि तुम्हाला काय करायचं आहे याचा संक्षिप्त उल्लेख करा. 2. तुमची कौशल्यं आणि सॉफ्ट स्किल्स यांचा उल्लेख करा. 3. तुमचा अनुभव नेमक्या पद्धतीने मांडा 4. तुम्ही केलेली उल्लेखनीय एक्स्ट्रा-करिक्युलर कामं सांगा. नोकरी शोधणारे कित्येक उमेदवार नेटवर्किंगचा (Use networking for seeking job) वापरच करत नाहीत. तुमच्या क्षेत्रातल्या व्यक्तींसोबत असलेली ओळख तुमच्या भरपूर फायद्याची ठरते. सोबतच, तुमचं संवादकौशल्यदेखील (Communication skills) वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्यासही मदत होते. नोकरीविषयक वेबसाइट्स आणि नेटवर्किंग साइट्सवर एक चांगलं प्रोफाइल (Make good profile on networking sites) तयार करणंदेखील फायद्याचं ठरतं. तुम्हाला जिथे जायचं आहे अशा कंपन्यांमध्ये काय सुरू आहे आणि तुमचं कशा प्रकारे योगदान असू शकतं याचा अंदाज तुम्हाला यामुळे येतो.