मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

परदेशात शिक्षणासाठी जायचंय पण इंग्रजीची भीती वाटतेय? मग ही पुस्तकं करतील मदत

परदेशात शिक्षणासाठी जायचंय पण इंग्रजीची भीती वाटतेय? मग ही पुस्तकं करतील मदत

आम्ही तुम्हाला अशी काही पुस्तकं सांगणार आहोत जी वाचून तुमचा इंग्रजीबद्दलचा नक्कीच आत्मविश्वास वाढेल.

आम्ही तुम्हाला अशी काही पुस्तकं सांगणार आहोत जी वाचून तुमचा इंग्रजीबद्दलचा नक्कीच आत्मविश्वास वाढेल.

आम्ही तुम्हाला अशी काही पुस्तकं सांगणार आहोत जी वाचून तुमचा इंग्रजीबद्दलचा नक्कीच आत्मविश्वास वाढेल.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 14 जुलै: भारतात लाखो विद्यार्थी दरवर्षी पदवी (Degree) प्राप्त करतात. अनेकांना चांगले गुणही असतात. मात्र परदेशात शिक्षणाची (Study in Abroad) संधी मिळाली तरी संभ्रमात असतात. याचं प्रमुख कारण म्हणजे इंग्रजी बोलण्याची भीती (Fear of English speaking) आणि कमी आत्मविश्वास (Confidence building). इंग्रजी हा विषय आपण लहानपणीपासून शिकत असतो, लिहीत असतो मात्र आपण सहजपणे बोलू शकत नाही. म्हणून शिक्षणासाठी जातं अनेक विद्यार्थी चिंतेत असतात. पण आता अजिबात चिंता करू नका. आम्ही तुम्हाला अशी काही पुस्तकं (Best books for English Speaking) सांगणार आहोत जी वाचून तुमचा इंग्रजीबद्दलचा नक्कीच आत्मविश्वास वाढेल.

स्पोकन इंग्लिश फॉर माय वर्ल्ड (Spoken English for My World by Sabina Pillai)

काही लोकांना इंग्रजी वाचणंआणि लिहिणं चांगलं येतं मात्र बोलण्यात समस्या असते. पण या पुस्तकाद्वारे तुम्ही इंग्रजी बोलण्यातही प्रभुत्व मिळवू शकणार आहात. हे पुस्तक ऑडिओ आणि व्हिडिओ फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे. ज्या लोकांना दैनंदिन जीवनात इंग्रजी बोलायच आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप चांगलं आहे.

कॉमन एरर्स इन एव्हरीडे इंग्लिश (Common Errors in Everyday English by Saumya Sharma)

या पुस्तकात केवळ सामान्य चुकांचाच समावेश नाही तर त्यात काही शब्दही आहेत ज्यांचा आपण चुकीचा उच्चार करतो. त्यामध्ये वारंवार व्याकरणातील चुका देखील समाविष्ट असतात. हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक आहे आणि सहज वापरण्यायोग्य आहे.

हे वाचा - Job Alert: चंद्रपूर जिल्हा परिषदेत CA पदाच्या तब्बल 389 जागांसाठी भरती

बी ग्रामर रेडी (Be Grammar Ready by John Eastwood)

या पुस्तकात भारतीय वाचकांच्या गरजा विचारात घेतल्या आहेत. त्यानुसार व्याकरणाचे अपडेटेड नियम दिले आहेत. व्याकरणाचा वापर देखील चांगल्या प्रकारे समजवून सांगण्यात आला आहे. सराव करण्यासाठी अनेक स्वाध्याय दिले गेले आहेत.

IELTS जनरल ट्रेनिंग (The Definitive Guide to IELTS General Training)

आयईएलटीएस (International English Language test System) लक्षात ठेवून हे पुस्तक खास बनवलं गेलं आहे. यामध्ये चारही विभागांचे वाचन, लेखन, ऐकणे आणि बोलण्याच्या चाचण्या देण्यात आल्या आहेत.

द एलिव्हेट सिरीज (The Elevate Series by Shefali Ray, Samathmika Balaji and Simran Luthra)

पुस्तकांच्या या सिरीजमध्ये तीन पुस्तकं आहेत. यामध्ये प्रारंभ, मध्यम आणि पूर्व मध्यम अशे तीन स्तर आहेत. CEFR नावाच्या आंतरराष्ट्रीय लँग्वेज फ्रेमवर्कनुसार या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहेत. ही पुस्तक वाचणाऱ्याच्या सर्वांगीण विकासात ही पुस्तकं मदत करतात. इंग्लिश बोलणे, ऐकणे आणि लिहिणं अगदी सोप्या पद्धतीनं शिकण्यासाठी ही पुस्तकं मदत करतात.

First published:

Tags: Education