जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / IITतून पदवी, महिना 50 लाखांची नोकरी; सगळं सोडून सुरू केली दूध विक्री, थक्क करणारी यशोगाथा

IITतून पदवी, महिना 50 लाखांची नोकरी; सगळं सोडून सुरू केली दूध विक्री, थक्क करणारी यशोगाथा

IITतून पदवी, महिना 50 लाखांची नोकरी; सगळं सोडून सुरू केली दूध विक्री, थक्क करणारी यशोगाथा

नोकरी सोडली तेव्हा त्यांचा दरमहा 50 लाख रुपये पगार होता. भारतात आल्यानंतर त्यांनी अनेक व्यवसाय सुरू केले ज्यात त्यांना अपयश आलं.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 06 मे : भारतातील अनेक तरुण उद्योजकांनी आपल्या व्यवसायांसह स्टार्टअप कल्चरला प्रोत्साहन दिलं आहे. भारतात परदेशातील लाखो-कोट्यवधी रुपयांच्या नोकऱ्या सोडून छोटे उद्योग सुरू करणाऱ्या तरुण उद्योजकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हेच सर्व तरुण त्यांच्या स्टार्टअपद्वारे लाखो लोकांना रोजगार देत आहेत. अशाच तरुणांमध्ये किशोर इंदुकुरी यांचा समावेश होतो. किशोर यांनी अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी इंटेलमधील नोकरी सोडून भारतात दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी तयार केलेला ब्रँड ‘सीड्स डेअरी फार्म’ हैदराबादमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हैदराबादमध्ये जन्मलेल्या किशोर इंदुकुरी यांनी आयआयटी खरगपूरमधून केमिकल सायन्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडीही पूर्ण केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना लाखो रुपयांची नोकरीही मिळाली. पण, तिथे त्यांचं मन रमलं नाही आणि त्यांनी नोकरी सोडून गावी येण्याचा निर्णय घेतला. 18 लाखांचं पॅकेज सोडून तो विकू लागला ऊसाचा रस; तरुणाने का घेतला निर्णय? अमेरिकेतील नोकरी सोडून धरला गावाचा रस्ता किशोर इंदुकुरी हे यूएसएमधील अॅरिझोना येथील इंटेल कॉर्पोरेशनमध्ये इंजिनीअर म्हणून काम करत होते. एके दिवशी त्यांनी अमेरिकेतील लक्झरी लाइफ सोडून भारतात परतण्याचा आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी नोकरी सोडली तेव्हा त्यांचा दरमहा 50 लाख रुपये पगार होता. भारतात आल्यानंतर त्यांनी अनेक व्यवसाय सुरू केले ज्यात त्यांना अपयश आलं. भाजीपाला पिकवण्याच्या आणि विक्रीच्या व्यवसायात त्यांचे एक कोटी रुपये वाया गेले. मात्र, त्यांनी धीर सोडला नाही आणि 2012 मध्ये 20 गायी विकत घेऊन डेअरी फार्म सुरू केला. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा निर्णय ठरला. तोटा सहन करून विकलं दूध आश्चर्याची गोष्ट म्हणजे किशोर इंदुकुरी यांनी 30 रुपये उत्पादन खर्च असलेलं दूध 15 रुपये प्रतिलिटरनं विकलं. गाईंचं दूध काढण्यापासून ते दूध पोहोचवण्यापर्यंत अशी जवळपास सर्वच कामं त्यांनी केली. विशेष म्हणजे त्यांनी पाणी, औषधं आणि हॉर्मोन्सन वापर न करता दूध मार्केटमध्ये आणलं. ग्राहकांना आधी उत्पादन वापरून नंतर पैसे देण्यास सांगितलं. व्यवसायाबाबत त्यांची स्ट्रॅटेजी कामी आली. हैदराबादमधील सर्वांत मोठे मिल्क सप्लायर कठोर परिश्रमानं आणि समर्पणानं इंदुकुरी हैदराबादमधील सर्वांत मोठे खासगी दूध पुरवठादारांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांची कंपनी शेकडो शेतकऱ्यांकडून शुद्ध दूध विकत घेते आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवते. किशोर स्वत: 100 पेक्षा जास्त गुरं असलेलं फार्म हाऊस चालवतात. त्यांच्याकडे 120 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. सध्या ते सबस्क्रिप्शन मॉडेलवर आपला व्यवसाय चालवतात. त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 2020-21मध्ये कंपनीचा महसूल 44 कोटी रुपये होता. यानुसार हिशेब केला तर किशोर यांचं रोजचं उत्पन्न 12 लाख रुपये होतं. 2021-22 मध्ये त्यांच्या महसूलात वाढ होऊन ही रक्कम 64.5 कोटी रुपये झाली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: career
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात