मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

कामाची बातमी! वार पाहून करा नवीन नोकरी जॉईन; कोणीही थांबवू शकणार नाही तुमची प्रगती

कामाची बातमी! वार पाहून करा नवीन नोकरी जॉईन; कोणीही थांबवू शकणार नाही तुमची प्रगती

नोकरीवर रुजू होण्यासाठी योग्य वार (Perfect day to join job) कोणता याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

नोकरीवर रुजू होण्यासाठी योग्य वार (Perfect day to join job) कोणता याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

नोकरीवर रुजू होण्यासाठी योग्य वार (Perfect day to join job) कोणता याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

मुंबई, 12 मे:  तुम्हाला जेव्हा नोकरीची ऑफर मिळते, तेव्हा एक प्रश्न नक्कीच विचारला जातो – जॉइन कधी करणार? अशा वेळी तुम्ही पटकन सोमवार बोलून मोकळे होता. बहुतांश जणांच्या मनात नोकरीचा पहिला दिवस म्हटलं की सोमवारच येतो; मात्र सोमवारी नोकरी जॉइन करणं फायद्याचं ठरेलच असं नाही. तुम्ही नोकरी जॉइन करण्यासाठी कोणत्या वाराची (Job joining day) निवड करता यावर तुमची कामाच्या ठिकाणची प्रगती अवलंबून असते. त्यामुळे नोकरीवर रुजू होण्यासाठी योग्य वार (Perfect day to join job) कोणता याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. याबाबतची माहिती देणारं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे.

केवळ नवी नोकरीच नाही, तर बदली झाल्यानंतर नव्या ठिकाणी पदभार स्वीकारण्यासाठी किंवा मग प्रमोशन झाल्यानंतर नवीन पदावर काम सुरू करण्यासाठीही तुम्ही कोणता वार निवडता (Best day to start new position at job) हे महत्त्वाचं ठरतं. अशा वेळी भद्रा आणि राहू काळ (Astrology tips) या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या पदावर जात आहात, त्या ठिकाणी तुम्हाला टिकून रहायचं असेल तर ठराविक वारालाच जॉयनिंग (Join on specific day) करणं फायद्याचं ठरतं.

Engineer उमेदवारांनो, मुंबईत 2,15,900 रुपये पगाराची नोकरी; ही घ्या अर्जाची लिंक

तुमचा विश्वास बसणार नाही; मात्र शनिवार हा नवीन ठिकाणी जॉयनिंग करण्यासाठी सर्वांत उत्तम दिवस समजला जातो. या दिवशी नोकरीवर रुजू (Start new job on Saturday) झाल्यास अधिक काळापर्यंत ती नोकरी टिकून राहते. कोणत्याही क्षेत्रातली नोकरी सुरू करण्यासाठी शनिवार हाच दिवस उत्तम मानला जातो. रविवारचा दिवसदेखील नोकरीवर रुजू होण्यासाठी अगदी फायद्याचा असतो; मात्र बहुतांश ठिकाणी रविवारी सुट्टी असते. त्यामुळे या दिवशी जॉयनिंग करणं शक्य होत नाही; पण तुम्हाला संधी मिळाली, तर रविवारच्या दिवशीही तुम्ही जॉयनिंग करू शकता.

बऱ्याच ठिकाणी शनिवार-रविवार असे दोन दिवस साप्ताहिक सुटी असते. शनिवारी तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम आल्यास तुम्ही त्याऐवजी गुरुवारीदेखील नोकरीवर रुजू होऊ शकता. शिक्षण, कायदे, न्यायालय, धार्मिक ट्रस्ट आणि संस्था अशा ठिकाणी नोकरी सुरू करण्यासाठी गुरुवारचा (Job Astro) दिवस उत्तम असतो. अबकारी विभाग, टॅक्स आणि महसूल क्षेत्रातल्या व्यक्तींनी मात्र शनिवारीच जॉयनिंग करणं गरजेचं आहे. अशा व्यक्तींनी गुरुवारी नोकरी जॉइन करणं टाळावं. शनिवार आणि गुरुवार अशा दोन्ही दिवशी शक्य नसल्यास मंगळवार हादेखील एक चांगला पर्याय आहे. विशेषतः सैन्य, महसूल, मेडिकल, इलेक्ट्रिकल, अन्न विभाग आणि सर्व टेक्निकल क्षेत्रांमध्ये मंगळवारी जॉयनिंग करणं शुभ ठरेल.

सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी जॉयनिंग केल्यास त्या नोकरीत स्थिरता मिळत नाही, असं म्हणतात. त्यामुळे या दिवशी कामावर रुजू होणं टाळा. अर्थात, बऱ्याच वेळा नोकरीमध्ये शिक्षा म्हणून बदली केली जाते. तसंच कित्येक वेळा प्रमोशन होऊन झालेली बदली आपल्याला नावडत्या ठिकाणी पाठवलं जातं. अशा वेळी खरं तर त्या ठिकाणी स्थिरता नको (join on these days if you don’t want stability) असते. त्यामुळे तुम्ही जर अशा परिस्थितीमध्ये असाल, तर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी केलेलं जॉयनिंग तुमच्या फायद्याचंही ठरू शकतं.

वर्धाच्या वर्धिनी महिला बचतगटाचा जगात डंका, 54 वस्तूंची ॲमेझॅानवर विक्री

तुम्ही जॉइन करत असलेल्या दिवशी पंचमी, दशमी किंवा पौर्णिमा असल्यास त्याचा अधिक फायदा होतो. ज्यांना आपल्या नोकरीत भरपूर स्थिरता हवी आहे, त्यांनी अशा मुहूर्तावर जॉइईन होण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना स्थिरता नको आहे, त्यांनी हे दिवस टाळावेत. तुम्हाला दिवसाचा शुभ मुहूर्त निवडण्याची संधी मिळाली तर अभिजित मुहूर्तावर (Abhijit Muhurta) जॉयनिंग करण्याचा प्रयत्न करा; मात्र बुधवारी अभिजित मुहूर्तावेळी राहूकाळ सुरू असतो. त्यामुळे या दिवशी हा मुहूर्त टाळा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Jobs Exams