मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

टीसीएस, विप्रो की टेक महिंद्रा? नोकरी करण्यासाठी कोणती कंपनी अधिक चांगली?

टीसीएस, विप्रो की टेक महिंद्रा? नोकरी करण्यासाठी कोणती कंपनी अधिक चांगली?

TCS, Wipro की Mahindra नोकरीसाठी कोणती कंपनी अधिक चांगली?

TCS, Wipro की Mahindra नोकरीसाठी कोणती कंपनी अधिक चांगली?

आयटी क्षेत्रातल्या टीसीएस, विप्रो व टेक महिंद्रा या तीन जायंट्सबाबत तुमचाही गोंधळ उडाला असेल, तर ही माहिती तुम्हाला नेमका निर्णय घेण्यास मदत करील.

आयटी (Information Technology) कंपन्यांमध्ये दर वर्षी मोठी भरती होत असते. आयटी इंडस्ट्रीचा विस्तार खूप मोठा असून, अनेक विद्यार्थी या क्षेत्रात शिक्षण घेतात. त्यामुळे दर वर्षी शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखाद्या मोठ्या आयटी कंपनीत नोकरीची अपेक्षा असते. भारतात टीसीएस (TCS), विप्रो (Wipro) आणि टेक महिंद्रा (Tech Mahindra) या तीन बड्या आयटी कंपन्या दर वर्षी हजारो जणांची भरती करतात. या कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी असं अनेकांना वाटतं; मात्र नेमक्या कोणत्या कंपनीत जाण्यासाठी प्रयत्न करावेत, हे ठरवणं महत्त्वाचं असतं. त्या निर्णयप्रक्रियेला उपयोगी ठरण्यासाठी टीसीएस, विप्रो व टेक महिंद्रा या कंपन्यांची माहिती घेऊ या. 'जॉबबझ' या एम्पलॉयर रेटिंग पोर्टलवर कर्मचाऱ्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणांच्या आधारे टीसीएस, विप्रो व टेक महिंद्रा या कंपन्यांची तुलना (A Guide For Techies To Choose Better Employer) करणारं वृत्त 'कंटेंट डॉट टेकगिग डॉट कॉम' या वेबसाइटने दिलं आहे. नुकताच पासआउट झालेला विद्यार्थी मल्टिनॅशनल आयटी कंपनीत काम करण्याचं स्वप्न बाळगतो, तेव्हा काही गोष्टी प्रामुख्यानं पाहतो. त्या कंपनीत मिळणारा पगार, कामाच्या ठिकाणचं वातावरण, सहकारी या गोष्टी काम करावं की नाही, याबाबत ठरवण्यासाठी उपयोगी ठरतात. तरीही नक्की कोणत्या कंपनीची निवड करायची याबाबत गोंधळ उडतोच. आयटी क्षेत्रातल्या टीसीएस, विप्रो व टेक महिंद्रा या तीन जायंट्सबाबत तुमचाही गोंधळ उडाला असेल, तर ही माहिती तुम्हाला नेमका निर्णय घेण्यास मदत करील. पगाराचं पॅकेज नव्या उमेदवारांना पगाराचं सर्वांत जास्त आकर्षण असतं. कोणती कंपनी किती पॅकेज (Salary Package) देते यावर त्यांचं लक्ष असतं. या तुलनेबाबत कर्मचाऱ्यांना विचारलं असता, 75 टक्के कर्मचाऱ्यांनी टीसीएसचं पॅकेज चांगलं असल्याचं सांगितलं, तर विप्रोही चांगलं पॅकेज देत असल्याचं 70 टक्के कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. टेक महिंद्राही कर्मचाऱ्यांना चांगला पगार देते असं त्या कंपनीच्या 72 टक्के कर्मचाऱ्यांना वाटतं. कामाच्या ठिकाणचं वातावरण कंपनीत काम करताना तिथलं वातावरण (Work Environment) पगाराइतकंच, किंबहुना थोडं जास्तच महत्त्वाचं असतं. 80 टक्के कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे, की टीसीएसमध्ये खेळीमेळीचं वातावरण असतं. 77 टक्के कर्मचारी म्हणतात, की विप्रो कर्मचाऱ्यांना कामासाठी चांगलं पोषक वातावरण देते. टेक महिंद्रामध्ये हेल्पफुल व खेळीमेळीचं वातावरण असतं असं 79 टक्के कर्मचाऱ्यांना वाटतं. भत्ते व सुविधा कंपन्यांकडून दिले जाणारे भत्ते व इतर सुविधा (Compensation And Benefits) यांबाबत टीसीएसच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीला 5 पैकी 4.2 इतकं रेटिंग दिलं आहे. विप्रोच्या कर्मचाऱ्यांनी 4.1, तर टेक महिंद्राच्या कर्मचाऱ्यांनी 4.0 रेटिंग आपल्या कंपनीला दिलं आहे. म्हणजेच टीसीएस कर्मचाऱ्यांना इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक भत्ते व सुविधा देते. करिअरच्या संधी या कंपन्या कर्मचाऱ्यांना करिअरच्या संधी (Career Opportunities) किती व कशा देतात, याबाबतही कर्मचाऱ्यांनी कंपन्यांना रेटिंग दिलं आहे. टीसीएसला 4.2, विप्रोला 4.4, तर टेक महिंद्राला 4.1 असं रेटिंग मिळालं आहे. या निकषामध्ये विप्रो उजवी ठरली आहे. सहकारी कंपनीत सोबत काम करणारे कर्मचारी (Colleagues) खूप महत्त्वाचे असतात. विशेषतः नवीन नोकरी असेल, तर याकडे गांभीर्याने पाहिलं जातं. याबाबत 70 टक्के कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे, की टीसीएसमधले कर्मचारी स्मार्ट असतात. विप्रोमधले कर्मचारी खूप समजूतदार असल्याचं 75 टक्के कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. टेक महिंद्रामधले कर्मचारी मदत करणारे असल्याचं 77 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. हेही वाचा - `ही` कंपनी कर्मचाऱ्याला नोटीस पीरियडमध्ये देते 10 टक्के पगारवाढ... टीसीएस ही भारतीय मल्टिनॅशनल आयटी कंपनी आहे. यात फर्म कन्सल्टिंग, आयटी आणि आउटसोर्सिंग आदी बाबी केल्या जातात. टेक महिंद्रा आणि विप्रो या टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्या आहेत. त्या बिझनेस कन्सल्टिंग आणि आउटसोर्सिंग सुविधा पुरवतात. पगाराच्या बाबतीत टीसीएस इतर दोन कंपन्यांच्या तुलनेत 0.1 टक्क्याने वरचढ आहे. चांगल्या सहकाऱ्यांच्या बाबतीत टेक महिंद्राचं पारडं जड आहे, तर करिअरच्या संधींमध्ये विप्रोनं इतर दोन्ही कंपन्यांना मागे टाकलं आहे. या तिन्ही कंपन्या आयटी क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनीची काही बलस्थानं आहेत. उमेदवारांनी आपल्या वैयक्तिक विचारांनुसार निवड करावी.
First published:

Tags: Career, Career opportunities, Tech Mahindra

पुढील बातम्या