मराठी बातम्या /बातम्या /करिअर /स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6500 पदांची मेगा भरती; नोकरीसाठी असा करा अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6500 पदांची मेगा भरती; नोकरीसाठी असा करा अर्ज

उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येईल. या पदांसाठी ऑगस्टमध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल.

उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येईल. या पदांसाठी ऑगस्टमध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल.

उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येईल. या पदांसाठी ऑगस्टमध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल.

    मुंबई 17 जुलै: कोरोना महामारीमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. या काळात काहींना रोजगार गमवावा लागला. सध्या बरेचजण नवीन रोजगाराच्या संधी शोधताना दिसतात. त्या दृष्टीने आपल्यासाठी रोजगाराची एक संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने (SBI) ही संधी उपलब्ध करून दिली आहे. SBI ने 6,100 ॲप्रेंटिस (Apprentice) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी SBI ने अर्ज मागविले आहेत. उमेदवार SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 6 जुलैपासून सुरू झाली आहे. तर 26 जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येईल. या पदांसाठी ऑगस्टमध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल.

     दहावी नापासांना रिसॉर्टमधील मुक्काम आणि फ्री बिर्याणी, निराशा दूर करण्यासाठी केरळी उद्योजकांकडून अनोख्या ऑफर्स

    पात्रता

    ॲप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान पदवीधर असणं आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे असावे. या पदासाठी मासिक वेतन 15,000 रुपये आहे. ऑनलाईन अर्ज केल्यावर उमेदवाराला फी देखील भरावी लागेल. त्याशिवाय अर्जाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. सर्वसाधारण (General), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) कॅटेगरीतील (Category) उमेदवारांसाठी परीक्षा फी 300 रुपये आहे. तसेच एससी (SC) / एसटी (ST) आणि दिव्यांग (PWD) उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेण्यात येत नाही.

    सरकारी नोकरी; एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीला हवे आहेत प्रोजेक्ट इंजिनीअर

    परीक्षेचा पॅटर्न

    लेखी परीक्षा एकूण 100 गुणांची असेल. ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातील. परीक्षेमध्ये सामान्य आर्थिक ज्ञान, सामान्य इंग्रजी, क्वांटिटेटिव ॲप्टिट्युड (Quantitative Aptitude) आणि रिझनिंग एबिलिटी (Reasoning Ability) आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्युड (Computer Attitude) या चार विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. चारही विषयांसाठी प्रत्येकी 25-25 प्रश्न विचारले जातील.

    कॅटेगरीनुसार पदं

    आरक्षणाच्या नियमांनुसार एकूण 6,100 पदे वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. ज्यामध्ये 2577 सर्वसाधारण, 604 ईडब्ल्यूएस, 1375 ओबीसी, 977 एससी आणि 567 जागा एसटीसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

    तुम्हीही या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. बँकेच्या वेबसाइटवर (Bank Website) जाऊन याबद्दलचं परिपत्रक (Notification) पूर्ण वाचा आणि त्यानुसार 26 जुलैपूर्वी अर्ज करा. या परीक्षेत आणि पुढच्या प्रक्रियेत यश मिळालं तर सरकारी नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळेल. लागा तयारीला.

    First published:
    top videos

      Tags: Job, State bank of india, State goverment