• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • सरकारी नोकरी; एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीला हवे आहेत प्रोजेक्ट इंजिनीअर

सरकारी नोकरी; एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीला हवे आहेत प्रोजेक्ट इंजिनीअर

एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (Aeronautical Development Agency) या सरकारी संस्थेने प्रोजेक्ट इंजिनीअर या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

 • Share this:
  एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (Aeronautical Development Agency) या सरकारी संस्थेने प्रोजेक्ट इंजिनीअर या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार www.ada.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. दिलेल्या नियमांनुसार केलेला अर्जच स्वीकारला जाणार असल्याचं संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी या संस्थेला 68 प्रोजेक्ट इंजिनीअर्स हवे आहेत. त्या पदाकरिता अर्ज करणाऱ्यांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची मेकॅनिकल इंजिनीअरिंगची (Mechanical Engineering) पदवी असणं आवश्यक आहे. तसंच, संबंधित उमेदवाराला संबंधित क्षेत्रात कामाचा किमान दोन ते जास्तीत जास्त आठ वर्षांचा अनुभव असणंही गरजेचं असल्याचं संस्थेने अधिसूचनेत म्हटलं आहे. 35 ते जास्तीत जास्त 55 वर्षं वय असलेले उमेदवारच या पदांसाठी अर्ज करू शकतात. पात्रतेच्या निकषांसंदर्भात, तसंच भरतीशी निगडित सर्व प्रकारच्या अधिक माहितीसाठी उमेदवार www.ada.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशन पाहू शकतात. या पदांवर उमेदवारांची निवड त्यांच्या मुलाखतीच्या आधारे केली जाईल. सुरुवातीला, इच्छुक उमेदवारांकडून आलेल्या सर्व अर्जांची छाननी करून प्राथमिक मुलाखतीसाठी काही जणांची निवड केली जाईल. प्राथमिक मुलाखतीच्या टप्प्यातून निवडल्या गेलेल्या उमेदवारांना अंतिम टप्प्यातल्या मुलाखतीसाठी पाचारण केलं जाईल. त्यातून निवडलेल्या उमेदवारांना या पदावर नियुक्त केलं जाईल. हे वाचा - अखेर दहावीचा निकाल लागला; कधी लागणार बारावीचा निकाल; जाणून घ्या निवड झालेल्या उमेदवारांना निवड झालेल्या लेव्हलनुसार मासिक 50 हजार ते 70 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळेल. त्याव्यतिरिक्त महागाई भत्ताही दिला जाईल. या भरतीसाठीची अधिसूचना पाच जुलै 2021 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 8 जुलै 2021 पासून इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, त्यासाठीची अंतिम मुदत 28 जुलै 2021 ही आहे. www.ada.gov.in या वेबसाइटवर जाऊन इच्छुकांनी अर्ज करायचा आहे. संरक्षण मंत्रालयांतर्गत (Defence Ministry) असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास विभागामधली (Department of Defence research & Development) एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी ही एक स्वायत्त संस्था आहे. हवाई दलासाठी आणि नौदलासाठी तेजस (Tejas) या हलक्या लढाऊ विमानांचं डिझाइन या संस्थेनेच विकसित केलं आहे. अॅडव्हान्स्ड मीडियम काँबॅट एअरक्राफ्ट आणि ट्विन इंजिन डेक बेस्ड फायटर विमानाच्या डिझाइनचं कामही हीच संस्था करते आहे.
  First published: