मुंबई, 1 जून- केंद्र सरकारमध्ये काम केलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा केंद्र सरकारसोबत नोकरी करण्याची संधी आहे. अर्थ मंत्रालय महसूल विभागांतर्गत काँपिटंट अथॉरिटी व अॅडमिनिस्ट्रेटर (गट ‘अ’ राजपत्रित) पद भरण्यासाठी अर्ज मागवत आहे. अर्थ मंत्रालय रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवारांना लाखो रुपये मासिक पगार मिळेल. तर, उमेदवाराची नियुक्ती पाच वर्षांसाठी केली जाईल. या जागेसाठी आवश्यक बाब म्हणजे उमेदवारांनी आधी केंद्र सरकारच्या डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं असावं. या संदर्भात ‘स्टडी कॅफे’ने वृत्त दिलंय. या पदासाठी रिक्त जागा, कार्यकाळ, निवडीचे निकष, पात्रता व इतर आवश्यक तपशील या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पदांची नावं अर्थ मंत्रालय रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, काँपिटंट अथॉरिटी व अॅडमिनिस्ट्रेटर (गट ‘अ’ राजपत्रित) पद भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आवश्यक पात्रता SAFEMA- अर्ज करणारे अधिकारी भारत सरकारच्या JS पेक्षा कमी दर्जाच्या पदावर केंद्र सरकारमध्ये अधिकारी नसावेत. NDPSA- सीमाशुल्क आयुक्त, केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्त, इन्कम टॅक्स कमिश्नर किंवा सारख्या दर्जाचे केंद्र सरकारचे कोणतेही अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकतात. Job Alert : सरकारी नोकरीची संधी! पगार ते पात्रता, जाणून घ्या कसा करायचा अर्ज? मासिक पगार अर्थ मंत्रालय रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवारांना पे स्केल 14 नुसार 144200 ते 218200 दरम्यान मासिक पगार मिळेल. कार्यकाळ अर्थ मंत्रालय रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवाराची निवड पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी केली जाईल. अर्ज कसा करायचा अर्थ मंत्रालय रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत अधिसूचनेमधून रिक्त अर्ज डाउनलोड करू शकतात आणि योग्यरित्या भरलेले अर्ज अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांसह पाठवू शकतात. त्यांना अर्ज Room No.51-II, Department of Revenue, Ministry of Finance, North Block, New Delhi-110001 या पत्त्यावर अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी पाठवावे लागतील. उमेदवार त्यांचे अर्ज gaurav.mehra85@nic.in किंवा kishan.kumar88@gov.in या ईमेलवरही सबमिट करू शकतात. केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जून 2023 आहे. अशा रितीने या रिक्त जागेसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. या पदासंदर्भातील इतर माहितीसाठी तुम्ही अर्थ मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना वाचू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







