मुंबई : केंद्र सरकारच्या कम्युनिकेशन मंत्रालयात (ministry of communication) कन्सल्टंट अर्थात सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पदासाठी वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींकडून ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज पाठवण्यासाठी अंतिम मुदत 19 जून 2023 पर्यंत आहे. हे पद करार तत्त्वावर भरण्यात येणार आहे. सल्लागार पदासाठी संबंधित विभागाने काही निकष निश्चित केले आहेत. या निकषांविषयीची माहिती सविस्तर जाणून घेऊया. कम्युनिकेशन मंत्रालयात सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या प्रक्रियेतून सल्लागार पदाच्या तीन जागा भरल्या जाणार आहेत. यातील दोन जागा सब डिव्हिजन इंजिनीअर आणि एक जागा ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर अशी आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात मंत्रालयाने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदासाठी ऑफलाइन अर्ज करावा लागेल. या पदाचा कार्यकाळ सहा महिने कालावधीसाठी अल्पमुदतीच्या करारावर आधारित असेल. हा करार जास्तीत जास्त सहा टर्मपर्यंत (प्रत्येकी सहा महिने) किंवा नियमित/ प्रतिनियुक्ती होईपर्यंत किंवा 65 वर्षांपर्यंत (जे आधीचे असेल) वाढवला जाऊ शकतो. कम्युनिकेशन मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, सल्लागार पदासाठी इच्छुक उमेदवार एडीई/जेटीओ, टेलिकम्युनिकेशन विभाग अथवा इतर कोणत्याही केंद्र, राज्य सरकारी विभागातून किंवा बीएसएनएल, एमटीएनएल, आयटीआय, टीसीआयएल मधून समकक्ष/ उच्च पदस्थ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेला असावा. नमूद पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या सेवानिवृत्त व्यक्तींना देय मासिक एकत्रित शुल्क/ मोबदला खर्च विभागाच्या अनुषंगाने असेल. हे पेमेंट दरमहा दिले जाईल. अर्ज आणि उमेदवारांच्या पात्रता निकषांच्या आधारे या पदावर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे, असं अधिसूचनेत म्हटलं आहे. कम्युनिकेशन मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, सल्लागार पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कम्युनिकेशन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवरून पदासाठीचा अर्ज डाउनलोड करून घ्यावा. डाउनलोड केलेला अर्ज संपूर्ण माहितीसह भरून तो डायरेक्टर (एचक्यू). O/o एसआर डीडीजी, एनसीसीएस, डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन, सिटी टेलिफोन एक्सचेंज, संपंगी रामा नगर, बेंगळुरू- 560027 या पत्त्यावर पाठवावा. ऑफलाइन अर्ज सबमिट करण्यासाठी 19 जून 23 पर्यंत मुदत आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी कम्युनिकेशन मंत्रालयाच्या अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.