नवी दिल्ली, 15 जुलै: गेल्या दीड वर्षांपासून जगभरात कोरोनानं (Corona) हाहाकार माजवला आहे. कोट्यवधी लोकं संक्रमित झाले आहे तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. मानवी आरोग्यावर याचा वाईट परिणाम तर झालाच आहे मात्र आता जॉब मार्केटवरही (Corona and Job Market) याचे वाईट परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये (Corona Lockdown) भारतात अनेक कंपन्यांची आर्थिक स्थिती (Financial condition) डबघाईला आली होती. त्यामुळे काही कंपन्यांनी नवीन उमेदवारांना जॉब (Jobs in Corona) देण्यास मनाई केली होती. तसंच काही कंपन्यांनी आहे ते कर्मचारीसुद्धा कमी केले होते. याचा फटका आता जॉब मार्केटला बसू लागला आहे. याबाबतीतील एक धक्कदायक आकडेवारी आता समोर आली आहे. LinkedIn या सोशल मीडिया आणि जॉब अप्लिकेशनच्या ‘Career Aspirations Gen Z India’ या सर्व्हेनुसार (Survey), कोरोनामुळे आता फ्रेशर्सना आणि नुकत्याच ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना जॉब मिळणं कठीण झाली आहे. इतकंच नाही आर अनुभवी लोकांनाही जॉबसाठी बऱ्याच कंपन्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या सर्व्हेनुसार कंपन्यांनी अनेकांच्या जॉब अप्लिकेशन रिजेक्ट केल्या आहेत. LinkedIn नं हा सर्व्हे Gen-Z च्या अंतर्गत केला आहे.ज्या लोकांचा जन्म 1995 च्या नंतर आणि 2010 नंतर झाला आहे अशा तरुण-तरुणींवर हा सर्व्हे केला जातो. म्हणजेच यामध्ये 18 ते 24 वर्ष वयोगटातील तरुण-तरुणी येतात. अशा लोकांच्या जॉब अप्लिकेशनवर हा सर्व्हे करण्यात आला आहे. हे वाचा - सुवर्णसंधी! आजपासून ‘या’ शहरात सुरु झाला ऑनलाईन जॉब मेळावा; मिळणार नोकरीची संधी इतक्या उमेदवारांची अप्लिकेशन झाली रिजेक्ट या सर्व्हेनुसार, Gen-Z पैकी तब्बल 70 टक्के लोकांची जॉब अप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आली आहे. म्हणजेच तब्बल 10 पैकी 7 जणांची जॉब अप्लिकेशन रिजेक्ट झाली आहे. केवळ 3 लोकांना जॉब मिळतोय. जॉब मार्केटवर कोरोनाचा काय परिणाम झाला आहे हे या आकडेवारीतून समोर आलं आहे. अनेक लोक तणावात आधीच कोरोनामुळे अनेकांचे जॉब गेले आहेत त्यामुळे असे लोक तणावात आहेत. तर ज्या उमेदवारांची जॉब अप्लिकेशन रिजेक्ट झाली आहे असेही उमेदवार चिंतेत आहेत. यानंतर आता जॉब कधी मिळणार याची चिंता त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लागून राहिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.