Home /News /career /

Job Alert: पोस्ट ग्रॅज्युएट युवकांना नोकरीची संधी; यूजीसीमध्ये ज्युनियर कन्सल्टंट पदांवर भरती

Job Alert: पोस्ट ग्रॅज्युएट युवकांना नोकरीची संधी; यूजीसीमध्ये ज्युनियर कन्सल्टंट पदांवर भरती

या पदावर निवड झाल्यास मासिक 50 ते 60 हजार रुपये वेतन मिळू शकतं.

    तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट (Post Graduate jobs) आहात का म्हणजेच तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी आहे का? त्यात तुम्हाला कमीत कमी 55 टक्के मार्क्स मिळाले आहेत का? आणि तुम्हाला कम्प्युटर, इंटरनेट आदींवर काम करता येतं का? या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असतील, तर मग तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये म्हणजेच (UGC) ज्युनियर कन्सल्टंट (Junior Consultant) या पदावर काम करण्याची संधी मिळण्यास तुम्ही पात्र आहात. या पदावर निवड झाल्यास मासिक 50 ते 60 हजार रुपये वेतन मिळू शकतं. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ugc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. त्यासाठी 12 जुलै 2021 ही अंतिम मुदत आहे. 'यूजीसी'ने प्रसिद्ध केलेल्या भरतीविषयक अधिसूचनेच्या हवाल्याने 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये ज्युनियर कन्सल्टंट म्हणून आठ पदांवर भरती केली जाणार आहे. याबद्दलची अधिसूचना विद्यापीठ अनुदान (University Grant Commission) आयोगातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदावरची भरती केवळ सहा महिन्यांकरिता कंत्राटी तत्त्वावर (Contract Basis) केली जाणार आहे. संबंधित उमेदवाराची कामाची पद्धत, आवाका आणि एकंदर वर्तन यांच्या आधारे हे काँट्रॅक्ट सहा महिन्यांनंतर पुढे वाढवलं जाऊ शकतं, असं 'यूजीसी'ने म्हटलं आहे. याबद्दलची अधिसूचना https://www.ugc.ac.in/pdfnews/6247724_Junior_Consultants_on_Contract_Basis_for_DEB.pdf  या लिंकवर उपलब्ध आहे. ती पूर्ण वाचूनच इच्छुकांनी अर्ज करावा. हे वाचा - प्राध्यापकांनो, गुड न्यूज! 3 हजार जागांच्या भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात या पदाकरिता अर्ज करू इच्छिणाऱ्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी (Post Graduation) घेतलेली असली पाहिजे. तसंच, कम्प्युटर, एमएस ऑफिस, इंटरनेट आदींवर काम करण्याचं ज्ञान संबंधित उमेदवाराकडे हवं. यासाठी उमेदवारांचं वय 21 ते 35 या मर्यादेत असणं गरजेचं आहे. आरक्षित वर्गांतल्या युवकांना सरकारच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाईल, असं 'यूजीसी'तर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. निवडल्या गेलेल्या उमेदवारांना डिस्टन्स एज्युकेशन ब्यूरोमध्ये (Distance Education Bureau) ज्युनियर कन्सल्टंट म्हणून काम करायचं आहे. संबंधितांना डिस्टन्स एज्युकेशन , ऑनलाइन एज्युकेशन (Online Education) या विषयांसंदर्भात ज्ञान हवं. या उमेदवारांना महिन्याला 50 ते 60 हजार रुपये कन्सल्टन्सी फीच्या रूपात दिले जातील. या पदाकरिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://www.ugc.ac.in/hrrecruit/ या लिंकवर जाऊन उमेदवारांनी आपली नोंदणी करणं अत्यावश्यक आहे. अधिक माहिती त्या वेबसाइटवरच मिळू शकेल.
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Distance, Graduation, Jobs, Online education

    पुढील बातम्या