मुंबई, 14 जुलै : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचा एक भाग असलेल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये (व्हीएसएससी) सायंटिस्ट/इंजिनीअर-SD आणि सायंटिस्ट/ इंजिनीअर - SC या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार व्हीएसएससीच्या vssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जात त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. इस्रो व्हीएसएससीमधील या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 21 जुलैपर्यंत आहे. या भरती प्रक्रियेतून संस्थेतील एकूण 61 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इस्रो व्हीएसएससीतील भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात. इस्रो व्हीएसएससीतील रिक्त पदांसाठी अर्ज कसा कराल : स्टेप 1 : अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम vssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे. स्टेप 2 : वेबसाइटच्या होमपेजवरील व्हीएसएससी रिक्रुटमेंट या लिंकवर क्लिक करावे. स्टेप 3 : लिंकवर क्लिक केल्यावर नवीन विंडो ओपन होईल. तिथे रिक्त जागांचा तपशील पाहायला मिळेल. स्टेप 4 : त्यानंतर उमेदवारांनी संपूर्ण अर्ज भरून आवश्यक कागदपत्रं अपलोड करावीत. स्टेप 5 : यानंतर भविष्यातील कामकाजासाठी भरलेला अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवावी. सॅलरी पॅकेजच्या बाबत XLRI च्या विद्यार्थ्यांची बाजी, वर्षाला घेताएत लाखो रुपयांचा पगार साइंटिस्ट/ इंजिनीअर - SD या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज केवळ इस्रो लाइव्ह रजिस्टर पोर्टलद्वारे ऑनलाईन सबमिट करावेत. उमेदवारांनी 21 जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इस्रोच्या लाइव्ह रजिस्टर पोर्टलवर नोंदणी करावी किंवा ती अपडेट करावी. साइंटिस्ट / इंजिनीअर - SC पदासाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. उमेदवारांशी संपर्क केवळ ईमेल किंवा व्हीएसएससी वेबसाईटद्वारे केला जाईल. यासाठी उमेदवारांनी त्यांचा ईमेल नियमितपणे तपासावा किंवा अपडेटसाठी वेबसाईटला नियमित भेट द्यावी. ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यासाठी उमेदवारांनी व्हीएसएससीच्या वेबसाईटला पाच जुलै रोजी सकाळी 10 वाजता आणि 21 जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता भेट द्यावी. दरम्यान, आज (14 जुलै) इस्रो श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान 3 लाँच करणार आहे. पंजाबमधील स्कूल ऑफ एमिनेन्सचे 40 विद्यार्थी चांद्रयान 3 लाँचमध्ये सहभागी होण्याकरिता तीन दिवसांसाठी श्रीहरीकोटा येथे जात आहेत. या शिवाय विद्यार्थ्यांना श्रीहरीकोटा येथील इस्रो फॅसिलिटी सेंटर आणि अंतराळ तंत्रज्ञानातील देशाच्या प्रगतीबद्दल जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.