मराठी बातम्या /बातम्या /करिअर /JOB ALERT: राज्यातील 'या' शासकीय ITI मध्ये नोकरीची मोठी संधी; दिलेल्या पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

JOB ALERT: राज्यातील 'या' शासकीय ITI मध्ये नोकरीची मोठी संधी; दिलेल्या पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोट जि.अकोला भरती

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोट जि.अकोला भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 असणार आहे.

अकोला, 30 डिसेंबर: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोट जि.अकोला (Government Industrial Training Institute Akot – Akola) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Govt ITI Akola Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सचिवीय सराव प्रशिक्षक, गणित आणि अभियांत्रिकी रेखाचित्र प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती (Government ITI jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती  

सचिवीय सराव प्रशिक्षक (Secretarial Practice Instructor)

गणित आणि अभियांत्रिकी रेखाचित्र प्रशिक्षक (Math & Engineering Drawing Instructor)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सचिवीय सराव प्रशिक्षक (Secretarial Practice Instructor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कॉमर्स किंवा आर्टस्मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी टायपिंग किंवा शॉर्ट हॅन्डचा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाशी निगडित किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

किंवा संबंधित विषयांमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा आणि अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तुम्हालाही पर्मनंट Work From Home हवंय? 'या' कंपन्या देताहेत WFHची संधी

गणित आणि अभियांत्रिकी रेखाचित्र प्रशिक्षक (Math & Engineering Drawing Instructor) - 

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही महाविद्यालयातून इंजिनिअरिंग पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना सॉफ्टवेअर्स आणि कम्प्युटबाबत ज्ञान असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाशी निगडित किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

किंवा उमेदवारांनी तीन वर्षांचा डिप्लोमा पुणे केला असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला, मनकर्ण प्लॉट, अकोट स्टँड, अकोला 4440011

क्या बात है! 'हे' जॉब देऊ शकतात श्रीमंत होण्याची संधी; सुरु करा पार्ट टाइम जॉब्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 जानेवारी 2022

JOB TITLEGovt ITI Akola Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसचिवीय सराव प्रशिक्षक (Secretarial Practice Instructor) गणित आणि अभियांत्रिकी रेखाचित्र प्रशिक्षक (Math & Engineering Drawing Instructor)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सचिवीय सराव प्रशिक्षक (Secretarial Practice Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कॉमर्स किंवा आर्टस्मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी टायपिंग किंवा शॉर्ट हॅन्डचा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाशी निगडित किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. किंवा संबंधित विषयांमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा आणि अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. गणित आणि अभियांत्रिकी रेखाचित्र प्रशिक्षक (Math & Engineering Drawing Instructor) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही महाविद्यालयातून इंजिनिअरिंग पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना सॉफ्टवेअर्स आणि कम्प्युटबाबत ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाशी निगडित किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांनी तीन वर्षांचा डिप्लोमा पुणे केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला, मनकर्ण प्लॉट, अकोट स्टँड, अकोला 4440011

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Akola, Career opportunities, जॉब