मुंबई, 20 जुलै: NTA ने अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर JEE मुख्य पहिल्या सत्र परीक्षेचा (JEE Mains Result 2022) निकाल अपलोड केला आहे. देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवू इच्छिणारे विद्यार्थी जेईई परीक्षेला बसतात. JEE मुख्य सत्र 2 ची परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA द्वारे JEE मेन 2022 प्रवेश पत्र सत्र 2 आणि परीक्षा सिटी स्लिप लवकरच जारी केली जाईल. त्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन ते डाउनलोड करू शकणार आहेत.
जेईई मुख्य दुसऱ्या सत्राचे प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. NTA ने 20 जुलै म्हणजेच आज या संदर्भात नोटीस जारी केली. त्यानुसार जेईई मुख्य सत्र 2 चे प्रवेशपत्र (JEE Mains Session 2 Admit card) 21 जुलै 2022 रोजी जारी केले जाईल. प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर उपलब्ध करून दिले जाईल. उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यांच्या मदतीने ते डाउनलोड करू शकतील.
दुसरीकडे, JEE मुख्य द्वितीय सत्राची परीक्षा 25 जुलै 2022 पासून घेतली जाईल. ज्यासाठी 629778 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा देशभरातील 500 शहरांमध्ये आणि देशाबाहेरील 17 शहरांमध्ये घेतली जाणार आहे.
अडचण असल्यास इथे करा संपर्क
एनटीएने जारी केलेल्या नोटीसमध्ये, विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र जारी केल्यानंतर त्यावरील सर्व मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचण्यास सांगितले आहे. तसेच, एनटीएने म्हटले आहे की प्रवेशपत्र डाउनलोड करताना उमेदवारांना काही अडचण आल्यास, ०११-४०७५९००० वर संपर्क साधा किंवा jeemain@nta.nic.in वर ईमेल करा.
इकडे तिकडे नोकरी शोधणं आता सोडा; पुणे महापालिकेत 448 पदांसाठी होतेय बंपर भरती; ही घ्या लिंक
एनटीएने उमेदवारांना इतर कोणत्याही माहितीसाठी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट देण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी, जेईई मुख्य सत्र 1 23 जून ते 29 जून 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. सध्या, NTA ने जारी केलेली नोटीस वाचण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Exam Fever 2022, Examination