नवी दिल्ली,15 जुलै: गेल्या काही दिवसांपूर्वीच JEE Main परीक्षेच्या चौथ्या सत्रातील (JEE mains 4th season dates) परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली होती. तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांच्या परीक्षेत काही दिवसांचं अंतर असावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार आता तिसऱ्या आणि चौथ्या सत्राच्या परीक्षांमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Minister Dharmendra Pradhan) यांनी यासंबधीची घोषणा केली आहे. आता जेईई मेन परीक्षेचं चौथं (JEE mains 4th season dates) सत्र 26, 27 आणि 31 ऑगस्ट आणि 1, 2 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. जेईई मेन 2021 ची चौथी आणि अंतिम परीक्षा यापूर्वी 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार होती. जेईई मुख्य परीक्षेचा तिसरा टप्पा 20 ते 25 जुलै आणि चौथा टप्पा 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार होता. दोघांमध्ये फक्त एक दिवसाचं अंतर ठेवलं होतं मात्र यावर अनेक विद्यार्थी नाराज झाले होते. हे वाचा - रस्त्यावर झाडू मारणाऱ्या महिलेची जिद्द! पूर्ण करून दाखवलं अधिकारी व्हायचं स्पप्न
National Testing Agency has been advised to provide a gap of 4 weeks between session 3 & session 4 of the JEE(Main) 2021 Exam. The JEE (Main) 2021 session 4 will now be held on 26th, 27th & 31st August, and on 1st and 2nd September 2021: Education Minister Dharmendra Pradhan pic.twitter.com/Ze8cTfkejL
— ANI (@ANI) July 15, 2021
परीक्षेच्या या दोन्ही सत्रांमधील अंतर वाढवावं अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. जेणेकरून त्यांना तयारीची संधी मिळेल. पहिल्या आणि दुसर्या सत्रांमधील परीक्षांमध्ये 15 दिवसांचं अंतर होतं. त्यानुसार या सत्रांमध्येही असावं आहि मागणी होती. आता ही मागणी मान्य करण्यात आली आहे आणि या सत्रांमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. या परीक्षांच्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांचा रँक ठरवला जाणार आहे. त्यानंतर JEE ऍडव्हांस हे परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे या परीक्षा लवकरात लवकर घेऊन JEE Advance परीक्षा घेणं महत्त्वाचं आहे.

)







