Home /News /career /

JEE Main 2021: परीक्षापद्धतीत 'हे' बदल करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे संकेत

JEE Main 2021: परीक्षापद्धतीत 'हे' बदल करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे संकेत

पुढील वर्षी होणाऱ्या JEE परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. या परीक्षेच्या पद्धतीमध्ये बदल करण्याचा विचार सध्या केंद्र सरकार (Union Government) करत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhriyal Nishank) यांनी हे संकेत दिले आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 11 डिसेंबर:  पुढील वर्षी होणाऱ्या JEE परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. या परीक्षेच्या पद्धतीमध्ये बदल करण्याचा विचार सध्या केंद्र सरकार (Union Government) करत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhriyal Nishank) यांनी एका वेबिनारमध्ये (Webinar) बोलताना याबाबत संकेत दिले आहेत. काय म्हणाले शिक्षण मंत्री? केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी एका वेबिनारच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना परीक्षा पद्धतीरील अनेक प्रश्नांवर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुढच्या वर्षी JEE Main परीक्षा तीन किंवा चार वेळा ठेवण्यावर सरकार विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर NEET 2021 ही परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. NEET 2021 ची परीक्षा रद्द झाल्यास विद्यार्थ्यांचं तसंच देशाचंही मोठं नुकसान होईल त्यामुळे ही परीक्षा रद्द होणार नसल्याचं शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना सोयीचं परीक्षा केंद्र निवडता यावं यासाठी यावर्षी  ही परीक्षा तीनदा पुढे ढकलण्यात आली, असा दावा त्यांनी केला. हे वाचा-School Reopen: 'या' राज्यात 14 डिसेंबरपासून सुरू होणार शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डानं (CBSE)  त्यांच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या JEE Main 201 आणि मेडिकलसाठी असलेल्या NEET 2021 या परीक्षांच्या अभ्यासक्रम कमी व्हावा यासाठी सातत्यानं चर्चा सुरु असल्याचंही पोखरियाल यांनी स्पष्ट केलं. “या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम अद्याप कमी झालेला नसून तो कसा कमी करता येईल यावर सातत्यानं चर्चा सुरु आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं. लवकरच वेळापत्रक जाहीर होणार जेईई आणि एनईटी परीक्षेंचं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून बारावी बोर्ड आणि या परीक्षा एकाच वेळी नसतील याची काळजी घेतली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. यापूर्वी जेईई मेन परीक्षेचा पहिला राऊंड जानेवारीच्या ऐवजी फेब्रुवारीत होणार असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या