School Reopen: 'या' राज्यात 14 डिसेंबरपासून सुरू होणार शाळा

School Reopen: 'या' राज्यात 14 डिसेंबरपासून सुरू होणार शाळा

शाळेत येण्याआधी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी होणार आहे. शासकीय केंद्रावरी कोरोनाच्या चाचणीचा रिपोर्ट घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मुंबई, पुणे आणि काही शहरांमध्ये 31 डिसेंबरपर्यंत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शाळा सुरू आहेत. मात्र महाराष्ट्राबाहेर काही राज्यांनी देखील शाळा सुरू न करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. मध्य प्रदेश, गुजरात इथे काही भागांमध्ये डिसेंबर अखेरपर्यंत आणि मार्च पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर ज्या भागांमध्ये कोरोनाचा धोका आणि संसर्ग कमी आहे अशा ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

हरियाणामध्ये देखील 14 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. 10 पासून ते 12वी पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 9 आणि 11 वीचे वर्ग 21 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. हरियाणा सरकारने दिलेल्या निर्देशानुसार असे सांगितले गेले आहे की राज्यातील सर्व सरकारी व खासगी शाळांमध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

हे वाचा-हाती झाडूऐवजी बॅटरी रिक्षाचं स्टेअरिंग आणि शहर स्वच्छ करायला निघाल्या त्या चौघी

शाळेत येण्याआधी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी होणार आहे. शासकीय केंद्रावरी कोरोनाच्या चाचणीचा रिपोर्ट घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्कॅनिंग आणि सॅनिटायझेशनची सुविधा असणार आहे.

शाळेत केवळ विद्यार्थीच नाही तर कर्मचारी आणि शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे. शाळेच्या आवारात प्रवेश घेण्यापूर्वी शिक्षकांची अध्यापन व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे कोरोना चाचणी केली जाणार आहेय प्रत्येकाला मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग बाळगणं आवश्यक आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 11, 2020, 9:18 AM IST

ताज्या बातम्या