मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Banking Jobs: बॅडन्यूज! सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळवणं होणार अधिक कठीण, काय आहे कारण? वाचा सविस्तर

Banking Jobs: बॅडन्यूज! सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळवणं होणार अधिक कठीण, काय आहे कारण? वाचा सविस्तर

Banking Jobs: बॅडन्यूज! सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळवणं होणार अधिक कठीण, काय आहे कारण? वाचा सविस्तर

Banking Jobs: बॅडन्यूज! सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळवणं होणार अधिक कठीण, काय आहे कारण? वाचा सविस्तर

Banking Jobs: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये भरतीसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोग्राम अंतर्गत गेल्या वर्षी 7,858 पदे भरण्यात आली होती, तर यावर्षी ही संख्या केवळ 6,035 वर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 24 सप्टेंबर: सरकारी बँकामध्ये नोकरी मिळवणं हे अनेकांचं स्वप्न असतं. एकदा का अशा एखाद्या बँकेत नोकरी मिळाली की पुढचं संपूर्ण आयुष्य सुखकर होतं. तुम्हीही सरकारी बँकेत स्वप्न उराशी बाळगत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. बँकांच्या शाखा विलीन झाल्यामुळं सरकारी बँकांमधील नोकऱ्या कमी होत आहेत.एका आकडेवारीवरून तुम्ही हे सहज समजू शकता. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये भरतीसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोग्राम अंतर्गत गेल्या वर्षी 7,858 पदे भरण्यात आली होती, तर यावर्षी ही संख्या केवळ 6,035 वर आली आहे. त्याचप्रमाणे, RRB म्हणजेच रिजनल रुरल बँकेत भरती झालेल्या पदांची संख्या देखील 6,898 वरून 4,567 वर घसरली आहे.

सरकारी बँकांमधील नोकऱ्या आणखी कमी होऊ शकतात-

अशा नोकऱ्या कमी होण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजं देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं नोकऱ्यांमध्ये केलेली कपात. या नोकऱ्यांमध्ये आणखी कपात होऊ शकते एवढंच नाही तर भरती पूर्णपणे बंद होण्याचीही शक्यता आहे. कारण एसबीआय आपला खर्च कमी करण्यासाठी मानव संसाधनसंबंधित समस्यांसाठी एक वेगळी कंपनी सुरू करणार आहे. या ऑपरेशनला आणि SBI च्या सपोर्ट सब्सिडियरीला अलीकडेच RBI कडून तत्वतः मान्यता मिळाली आहे. सुरुवातीला ही कंपनी ग्रामीण आणि निमशहरी भागातील बँक शाखांमधील कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन करेल. स्टेट बँक ऑपरेशन सपोर्ट सर्व्हिसेस म्हणजेच SBOSS द्वारे नियुक्त केलेले सर्व कर्मचारी कराराच्या आधारावर असतील. म्हणजेच यापुढे बँकांमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळणार नाही. कंत्राटी पद्धतीनं नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना SBI कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व फायदे मिळणार नाहीत. SBI नंतर, कदाचित इतर सरकारी बँका देखील असेच करतील, म्हणजेच हळूहळू बँकांमधील सरकारी नोकऱ्या रद्द केल्या जाऊ शकतात.

हेही वाचा: तुमचे एकापेक्षा जास्त बँकमध्ये Account आहेत? होऊ शकतं मोठं नुकसान

खर्च कमी करण्याच्या उपायांमुळे नोकऱ्या झाल्या कमी-

तज्ज्ञांचं म्हणणे आहे की बँकांचं विलीनीकरण आणि खर्चात कपात करण्याच्या उपायांमुळे अलिकडच्या वर्षांत भरतीमध्ये घट झाली आहे. याशिवाय लोक डिजिटल चॅनेल्सचा वापर वाढवत आहेत, म्हणजेच ऑनलाइन व्यवहार करत आहेत आणि त्यामुळे कामासाठी बँक शाखांकडे वळणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे, विशेषत: शहरी भागात यामध्ये लक्षणीय घट झाली आहे. बँकाही त्यांच्या शाखांचे विलीनीकरण करत आहेत. आणि या सर्व कारणांमुळे बँका नवीन नोकरभरती कमी करत आहेत. बँकांच्या विलीनीकरणाबद्दल आणि त्यांच्या शाखांच्या विलीनीकरणाबद्दल बोलायचं झाल्यास अलीकडच्या काळात मोठ्या बँकांमध्ये इतर अनेक बँकांचं विलीनीकरण झाले. उदाहरणार्थ एकट्या एसबीआयमध्ये बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला अशा अनेक बँकांचं विलीनीकरण झालं आहे. यानंतर बँकांच्या शाखांचंही विलिनीकरण करण्यात आले. त्यामुळेच नोकरभरती कमी होत आहे.

First published:

Tags: Bank exam, Career, Career opportunities, Job