जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / IT JOBS: Wipro कंपनीत BCA आणि B.Sc पास उमेदवारांसाठी बंपर Vacancy; या लिंकवर करा अप्लाय

IT JOBS: Wipro कंपनीत BCA आणि B.Sc पास उमेदवारांसाठी बंपर Vacancy; या लिंकवर करा अप्लाय

Wipro कंपनीत BCA आणि B.Sc पास उमेदवारांसाठी भरती

Wipro कंपनीत BCA आणि B.Sc पास उमेदवारांसाठी भरती

या पदभरतीसाठी अप्लाय करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे? याबाबत जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जानेवारी: देशातील नामांकित IT आणि टेक कंपनी Wipro इथे लवकरच काही जागांसाठी भरती (Jobs in Wipro) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. BCA आणि B.Sc पदवीधरांसाठी ही भरती (BCA & B.Sc jobs in Wipro) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन (Online job in Wipro) पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. Wipro आपल्या Work Integrated Learning Program 2.0’ अंतर्गत ही मोठी पदभरती (IT sector jobs for freshers) करणार आहे. या पदभरतीअंतर्गत नक्की कोणत्या उमेदवारांना संधी मिळणार आहे? कोणते उमेदवार पात्र (Eligibility Wipro Recruitment 2022) असणार आहेत? तसंच या पदभरतीसाठी अप्लाय करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे? याबाबत जाणून घेऊया. पालकांनो, पाल्यांना अभ्यासासोबतच शिकवा व्यवहारातील ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी या पदभरतीसाठी पात्रतेचे निकष या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन BCA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांनी बॅचलर ऑफ सायन्स B.Sc पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. B.Sc उत्तीर्ण उमेदवारांनी Computer Science, Information Technology, Mathematics, Statistics, Electronics आणि Physics या विषयांमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे 2020, 2021 किंवा 2022 बॅचचे पास आउट असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी ग्रॅज्युएशन दरम्यान Core Mathematics हा विषय शिकलेला असणं आवश्यक असणार आहे. बिझिनेस किंवा अप्लाइड Mathematics हा विषय चालणार नाही. दहावी ते ग्रॅज्युएशन शिक्षणादरम्यान जास्तीत जास्त तीन वर्षांची गॅप मान्य आहे. यावरती गॅप असल्यास असे उमेदवार पात्र असणार नाहीत. ग्रॅज्युएशन हे तीन वर्षांमध्ये पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. ग्रॅज्युएशन दरम्यान गॅप असल्यास असे उमेदवार पात्र ठरणार नाहीत. उमेदवारांनी दहावी आणि बारावी फुल टाइम केलं असणं आवश्यक आहे. मुलाखतीच्या दिवशीपर्यंत उमेदवारांचा फक्त एक बॅकलॉग असणं आवश्यक आहे. यावरती बॅकलॉग असतील ठरत असे उमेदवार पात्र असणार नाहीत. इतका मिळणार Stipend या पदभरतीसाठी अर्ज केल्यानंतर मुलाखत परीक्षा आणि सर्व टप्पे पार करून निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 23,000 रुपये प्रतिमहिना इतका Stipend देण्यात येणार आहे. Career Tips: Work From Home करताना तणावात आहात? चिंता नको. या टिप्स येतील कामी अशी होणार उमेदवारांची निवड या पद्भारतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची सुरुवातीला Online Assessment होणार आहे. ही परीक्षा 80 मिनिटांची असणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात Verbal, Analytical, Quantitative या विषयांतील वीस प्रश्न विचारले जाणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये Written Communication Test होणार आहे. ही टेस्टही वीस मिनिटांची असणार आहे. या सर्व टेस्ट पास केल्यानंतर उमेदवारांना डिस्कशन राउंडला सामोरं जावं लागणार आहे. यानंतरच निवड इंश्चित केली जाणार आहे. या पदभरतीसाठी अप्लाय करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2022 असणार आहे. तर उमेदवारांनी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी ‘careers.wipro.com/wilp’ या वेबसाईटवर जाऊन ‘Apply Now’ लिंकवर क्लिक करायचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात