Home /News /career /

Career Tips: Work From Home करताना तणावात आहात? चिंता नको. या टिप्स येतील कामी

Career Tips: Work From Home करताना तणावात आहात? चिंता नको. या टिप्स येतील कामी

अशा कंपन्या सांगणार आहोत ज्या कर्मचाऱ्यांना पर्मनंट वर्क फ्रॉम होम ऑफर करत आहेत.

अशा कंपन्या सांगणार आहोत ज्या कर्मचाऱ्यांना पर्मनंट वर्क फ्रॉम होम ऑफर करत आहेत.

हा ताण कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स (Tips to Handle Stress) देणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

    मुंबई, 09 जानेवारी: कोरोनामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील (Corporate world) बहुसंख्य कर्मचारी सध्या वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत आहेत. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपतपर्यंत अनेकजण काम करत आहेत. त्यात महिला कर्मचाऱ्यांना घरचे सर्व काम करून ऑफिसचे काम करावे लागत आहेत. ऑफिसचं काम सांभाळत असताना कर्मचाऱ्यांवर ताण (stress while doing work from home) येतो आहे. हा ताण कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स (Tips to Handle Stress) देणार आहोत. चला तर जाणून घेऊया. ही असू शकतात तणावाची कारणं    तुमच्या नोकरीबद्दल खात्री नाही तुमच्या पोस्टनुसार चुकीची पात्रता कामाचे टेन्शन असणे घरी वातावरण चांगलं नसणे मनासारख्या गोष्टी न घडणे अशा पद्धतीनं दूर ठेवा तणाव ताण तणाव दूर ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली झोप. दिवसभर काम केल्यानंतर चांगली आणि पूर्ण आठ तासांची झोप घेणं महत्त्वाचं आहे. तसंच नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. संतुलित आहारही महत्त्वाचा आहे. तणाव टाळण्यासाठी विश्रांती तंत्र आणि निरोगी जीवनशैली नेहमीच पुरेशी नसते. कधीकधी आपल्याला आपली कार्यशैली किंवा वातावरण बदलण्याची देखील आवश्यकता असू शकते. जर तुमच्या कंपनीमध्ये काही ताण तणावाची स्थिती असेल तर याबाबत लगेच आपल्या वरिष्ठांना कळवा. कोणत्याही प्रकारचे शोषण किंवा छळ झाल्यास, आपल्या HR विभागाला सूचित करा जेणेकरून ते त्यास सामोरे जाऊ शकतील. सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला अधिक तणाव जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. काम करताना ताण तणाव कमी करण्यासाठी जे जे शक्य होईल ते करा. पुन्हा वाढणार वर्क फ्रॉम होम? मुंबई, पुणे आणि नागपूर या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. मुंबईत तर कोरोना रुग्णांनी दहा हजारांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे पुन्हा सुरु होण्याच्या तयारीत असलेले ऑफिस पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काही कंपन्या हायब्रीड मॉडेलवर काम करत होत्या मात्र आता त्याही परत वर्क फ्रॉम होमच्या निर्णयावर ठाम आहेत. Infosys, HCL, Tech Mahindra सारख्या भारतातील IT कंपन्या Omicron Covid-19 प्रकाराबाबत अनिश्चिततेमध्ये कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत कधी बोलावू शकतील हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाहीये. Deloitte आणि Mindtree सारख्या कंपन्या ज्या कथितपणे त्यांची ऑफिसेस उघडण्याची योजना आखत होत्या त्या भारतात Omicron रुग्णांची संख्या वाढल्यानंतर आता संभ्रमात आहेत. कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावून त्यांचा जीव धोक्यात घालण्याची रिस्क कोणीही घेऊ इच्छित नाही.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Work from home

    पुढील बातम्या