मुंबई, 06 मार्च: दरवर्षी लाखो तरुण बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज करतात. भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी उमेदवाराला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) येथे प्रशिक्षण घ्यावे लागते. एनडीएमध्ये फक्त पुरुषांनाच प्रशिक्षण दिले जाते, असे बहुतेकांना वाटते, परंतु तसे नाही. एनडीएमध्ये महिलांना भारतीय सशस्त्र दलात सामील होण्यासाठी प्रशिक्षणही दिले जाते. एनडीएमध्ये सामील होण्यासाठी, तुम्हाला प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला NDA एंट्रन्स परीक्षेचा अभ्यासक्रम आणि या परीक्षेचं पॅटर्न नक्की कसं असतं तसंच यासाठी काय पात्रता असते हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
NDA परीक्षा म्हणजे नक्की काय?
नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) ही भारतातील अग्रगण्य जॉईन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे जी भारतीय सशस्त्र दलांना म्हणजे आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही यांना प्रशिक्षण देते. ज्या भारतीय तरुणांना आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये अधिकारी व्हायचे आहे, त्यांना एनडीएकडून प्रशिक्षण घ्यावे लागते. NDA मध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. ही परीक्षा UPSC द्वारे देशातील 41 केंद्रांवर घेतली जाते. एनडीए प्रवेश परीक्षा ही भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाची एकत्रित परीक्षा आहे. एनडीए लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीत निवडलेल्या उमेदवारांना एनडीए आणि नेव्हल अकादमीमध्ये प्रवेश दिला जातो.
इंजिनिअर्ससाठी मोठी खूशखबर; तब्बल 55,000 रुपये सॅलरी; BEL मध्ये 110 जागांसाठी भरती; करा अप्लाय
NDA एंट्रन्ससाठी पात्रता
NDA परीक्षेसाठी, उमेदवाराने 10+2 मध्ये विज्ञान शाखेसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयात 60% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत. भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदलासाठी ही पात्रता अनिवार्य आहे. तर भारतीय सैन्यासाठी कोणत्याही प्रवाहातून 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एनडीए प्रवेश परीक्षेसाठी उमेदवाराचे वय 16.5 वर्षे ते 19.5 वर्षे असावे. केवळ अविवाहित उमेदवारच NDA प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. एनडीएमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. फक्त भारतीय नागरिक NDA परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
असं असतं Exam Pattern
एनडीए प्रवेश परीक्षेतील लेखी परीक्षेत 2 पेपर असतात. यामध्ये पहिला पेपर गणिताचा आणि दुसरा पेपर सामान्य क्षमता चाचणीचा असतो. इयत्ता 11वी आणि 12वीचे विषय गणिताच्या पेपरमध्ये दिले आहेत. तर पेपर 2 मध्ये इंग्रजी आणि GK भाग A आणि भाग B मध्ये असतो.
कोणाला कुठे मिळतो प्रवेश
एनडीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना तीन वर्षांसाठी पुण्यात प्रशिक्षण दिले जाते. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार किंवा त्यांची तीन वर्षांतील कामगिरी पाहून लष्कर, नौदल आणि हवाई दलातून कोणतीही एक मिळते. त्यानंतर जे विद्यार्थी आर्मी निवडतात ते आयएमए डेहराडूनला जातात, नेव्हीचे इंडियन नेव्हल अकादमी, केरळमध्ये जातात आणि एअर फोर्सचे विद्यार्थी एएफए हैदराबादला जातात. जिथे ते आणखी एक वर्ष प्रशिक्षण घेतात. त्यानंतरच ते भारतीय लष्कराचा भाग बनतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Indian army, Job Alert, Jobs Exams, Marathi news, NDA