मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IT Jobs: मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये हजारो पदांसाठी भरती; तुमच्याकडे 'हे' स्किल्स आहेत ना?

IT Jobs: मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये हजारो पदांसाठी भरती; तुमच्याकडे 'हे' स्किल्स आहेत ना?

आयटी कंपन्यांमध्ये भरती

आयटी कंपन्यांमध्ये भरती

IT Jobs: टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिस या कंपन्यांमध्ये जावा लँग्वेज डेव्हलपर या पदासाठी भरती सुरू झाली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 16 ऑक्टोबर: गेल्या काही वर्षांत तरुणांचा माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्राकडे ओढा वाढला आहे. अन्य कोणत्याही क्षेत्रांच्या तुलनेत आयटी क्षेत्रात संधी आणि मोबदला या दोन्ही गोष्टी जास्त असल्याने साहजिकच तरुण या क्षेत्राकडे वळतात. कोरोना काळात आयटी क्षेत्राला काहीसा फटका बसला. पण आता हे क्षेत्र पुन्हा सावरताना दिसत आहे. आयटी क्षेत्रातल्या टीसीएस, विप्रो, इन्फोसिससारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी, असं प्रत्येक तरुणाला वाटतं. तुमचीदेखील अशीच इच्छा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिस या कंपन्यांमध्ये जावा लँग्वेज डेव्हलपर या पदासाठी भरती सुरू झाली आहे. या संधीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या करिअरला एक वेगळं वळण देऊ शकता. `टेकगिग डॉट कॉम`ने या विषयी माहिती दिली आहे.

जावा ही डेव्हलपर्समध्ये सर्वाधिक मागणी असलेली आणि वेगानं विस्तारणारी सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. जर तुम्ही करिअरमध्ये बदल करण्याचा किंवा नोकरीसाठी उत्तम संधीच्या शोधात असाल किंवा जावा डेव्हलपर म्हणून काम करण्याची तुमची इच्छा असेल तर एक उत्तम संधी तुमची वाट पाहात आहे. टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिस या कंपन्यांमध्ये जावा डेव्हलपर पदासाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून या पदासाठी अर्ज करू शकतात.

डिग्री कोणतीही असू देत Google India थेट देणार जॉब्स; या पदांसाठी लगेच करा अप्लाय

इन्फोसिस कंपनीच्या बेंगळुरू येथे ऑफिसमध्ये जावा डेव्हलपर (Java Developer) हे पद भरलं जाणार आहे. कंपनीत जावा डेव्हलपर म्हणून काम करणाऱ्या उमेदवाराला काही नियमांचं पालन करावं लागेल आणि जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. जावा डेव्हलपर म्हणून, उमेदवार क्लायंटच्या मागणीनुसार प्रभावी डिझाईन करणे, डेव्हलपमेंट आणि सपोर्ट अ‍ॅक्टिव्हिटिजमध्ये सहभागी होण्यास सक्षम असावा. क्लायंटच्या गरजा तपशीलवारपणे समजून घेण्याची क्षमता उमेदवाराकडे असावी. कंपनीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी उमेदवार सक्षम असावा, तसंच त्यांना आवश्यक गोष्टींचं भाषांतर सिस्टीममध्ये करता येणं गरजेचं आहे. प्रकल्पांची योग्य माहिती देण्यासाठी उमेदवारांना ओव्हरऑल इस्टिमेशन प्रोसेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल.

विप्रो कंपनीच्या बेंगळुरू कार्यालयात जावा एपीआय मायक्रो सर्व्हिसेस इंटिग्रेशन डेव्हलपर (Java API Microservices Integration-Developer) या पदासाठी भरती केली जात आहे. या पदावर काम करताना उमेदवाराला काही नियमांचं पालन करावं लागेल आणि जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. उमेदवारांकडे अ‍ॅप्लिकेशन ऑफ स्टॅंडर्ड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रिन्सिपल्सबाबतचा अनुभव असावा. उमेदवार स्वतंत्र तसंच टीम मेंबर म्हणून काम करण्यास सक्षम असावा. उमेदवाराला किमान एका डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी किंवा प्रोग्रॅमिंग लॅग्वेंजचे आकलन असणं गरजेचं आहे. उमेदवार टीम मेंबर्स आणि क्लायंटच्या प्रश्नांना किंवा रिक्वेस्टला प्रतिसाद देण्यास सक्षम असावा. गरज पडल्यास टीम मेंबर्सना मार्गदर्शन करण्याची क्षमता उमेदवाराकडे असावी.

तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत मिळेल पगार; इथून करा डिजिटल मार्केटिंगचा Free कोर्स

टीसीएस कंपनीच्या हैद्राबाद येथील कार्यालयात जावा डेव्हलपर (Java Developer) या पदासाठी भरती सुरू केली जात आहे. या पदावर काम करताना उमेदवाराला काही नियमांचं पालन करावं लागेल आणि जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. या पदासाठी इच्छुक उमेदवारांना Java 8/J2ee/web services/ Spring/ Spring Boot मधील उत्तम अनुभव असावा. उमेदवाराकडे डाटा बेसेसविषयी (Mysql, Oracle Etc.) चांगला अनुभव असावा. उमेदवाराकडे रिक्वायरमेंट गॅदरिंग, डिझाईन, इम्प्लिमेंटेशन, युनिट टेस्टिंग, डिप्लॉयमेंट आणि मेटेंनन्सचा चांगला अनुभव असावा. उमेदवाराकडे समस्या सोडवण्याचा आणि विश्लेषणात्मक क्षमतांचा मजबूत अनुभव असावा. तसंच उमेदवाराला व्हर्जन मॅनेजमेंट सिस्टीमचा चांगला अनुभव असणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams