जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Work From Home चालू राहणार की होईल बंद? काय आहे IT कंपन्यांचं प्लॅनिंग? जाणून घ्या एका क्लिकवर

Work From Home चालू राहणार की होईल बंद? काय आहे IT कंपन्यांचं प्लॅनिंग? जाणून घ्या एका क्लिकवर

सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून सहज जॉब

सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून सहज जॉब

आज आम्ही तुम्हाला काही IT कंपन्यांचा वर्क फ्रॉम होमबद्दलचा प्लॅन नक्की काय आहे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 एप्रिल: करोना महासाथीची तिसरी लाटही आता संपुष्टात आली आहे आणि झपाट्याने रुग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे हळूहळू आयटी क्षेत्रातल्या कंपन्या आता कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) या पद्धतीऐवजी वर्क फ्रॉम ऑफिस (Work From Office) या जुन्या पद्धतीकडे वळवू पाहत आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज या कंपन्या कामाचं हायब्रीड मॉडेल राबवत आहेत. मात्र आता पुन्हा कोरून डोकं वर काढू लागला आहे. त्यात बरेच IT ऑफिसेस सुरु होऊ लागले आहेत. बऱ्याच IT कंपनी अंतर्गत लेव्हलला कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचा प्लॅन तयार करत आहेत. मात्र या कंपन्यांचा प्लॅन नक्की आहे तरी काय? आज आम्ही तुम्हाला काही IT कंपन्यांचा वर्क फ्रॉम होमबद्दलचा प्लॅन नक्की काय आहे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. परीक्षा न देताही राज्यातील ‘या’ ESIC हॉस्पिटलमध्ये जॉबची संधी; थेट होणार मुलाखत

Infosys चं प्लॅनिंग

इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केली. सुरुवातीला इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी नीलांजन रॉय यांनी जाहीर केले की 95% कर्मचारी वर्क फ्रॉम होम काम करतात आणि 5% वरिष्ठ कर्मचारी कार्यालयात येतात. आता Infosys चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि प्रमुख (HR) रिचर्ड लोबो म्हणाले, “कंपनीला हायब्रीड मॉडेलची अपेक्षा आहे ज्यामध्ये जवळपास 40-50 टक्के कर्मचारी कार्यालयात परतण्याच्या नंतरच्या टप्प्यांनंतर ऑफिसमधून काम करतील”. TCS ची काय आहे योजना TCS ने 25×25 नावाचे नवीन कार्यरत मॉड्यूल तयार केले. या मॉडेलमध्ये 25% पेक्षा जास्त कंपनीच्या कर्मचार्‍यांना 2025 पर्यंत ऑफिसमधून काम करावे लागणार नाही आणि कर्मचार्‍यांना 2025 पर्यंत ऑफिसमध्ये 35% पेक्षा जास्त वेळ घालवण्याची गरज नाही. सध्याचे उर्वरित 75% कर्मचारी हायब्रिड मोडमध्ये काम करत होते. विद्यार्थ्यांनो, CBSE परीक्षेला उरलेत अवघे काही दिवस; ऐनवेळी करू नका ‘या’ चुका HCLचं प्लॅनिंग आयटी क्षेत्रातील प्रमुख एचसीएल टेक म्हणाले, “आमच्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा आणि कल्याण हे आमच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. आम्ही आमचे कार्य सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी देखील समर्पित आहोत जेणेकरुन आमच्या ग्राहकांना सेवा मिळत राहतील. आम्ही आता गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत आणि संकरित पद्धतीने कार्य करणे सुरू ठेवत आहोत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: job
  • First Published :
जाहिरात
जाहिरात