मुंबई, 19 एप्रिल : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) या देशाचा अभिमान असलेल्या संस्थेमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी आहे. प्रोपल्शन कॉम्प्लेक्सने (IPRC) टेक्निशियन्स आणि इतर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. उमेदवार रिक्त पदांसाठी इस्रो IPRC च्या अधिकृत वेबसाइट iprc.gov.in वर अर्ज करू शकतात. टेक्निशियन आणि इतर पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 27 मार्चपासून सुरू झाली आणि 24 एप्रिल 23 अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. कोणती पदं भरणार? या भरती प्रक्रियेद्वारे ISRO IPRC संस्थेमध्ये एकूण 63 पदं भरणार आहे. यामध्ये टेक्निकल असिस्टंट, ड्राफ्ट्समन ‘बी’, टेक्निशियन ‘बी’, हेवी वाहन चालक ‘ए’, हलके वाहन चालक ‘ए’ आणि फायरमन ‘ए’ या पदांचा समावेश आहे. वरील पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचावे. या नोटिफिकेशननुसार खालील जागा रिक्त आहेत.
–टेक्निशियन ‘बी’ (फिटर): 20 –टेक्निकल असिस्टंट (मॅकेनिकल): 15 –जड वाहनांचा ड्रायव्हर ‘ए’: 5 –टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन): 4 –टेक्निकल असिस्टंट (सिव्हिल): 3 –टेक्निशियन ‘B’ (इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक): 3 –टेक्निशियन ‘B’ (वेल्डर): 3 –टेक्निशियन ‘B’ (इलेक्ट्रिशियन): 2 –हलक्या वाहनासाठी ड्रायव्हर ‘ए’: 2 –टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रिकल): 1 – टेक्निकल असिस्टंट (कम्प्युटर सायन्स): 1 –टेक्निशियन ‘बी’ (फ्रीज व एसी): 1 – टेक्निशियन ‘बी’ (प्लंबर): 1 –ड्राफ्ट्समन ‘बी’ (सिव्हिल): 1 –फायरमॅन ‘ए’: 1 नवोदितांना BSNL मध्ये काम करण्याची संधी, ‘या’ पद्धतीनं करा लगेच अर्ज! पात्रतेची अट टेक्निशियन आणि इतर पदांसाठी किमान वयाची अट 18 वर्षे आहे. फायरमन ‘A’ पदासाठी कमाल वयोमर्यादा 25 वर्षे आणि इतर रिक्त पदांसाठी 24 एप्रिल रोजी 35 वर्षे असावे. याशिवाय उमेदवारांकडे पास केल्याचं सर्टिफिकेट आणि संबंधित विषयातील डिप्लोमा असणे आवश्यक आहे. अर्ज कसा भरावा? - ISRO ची अधिकृत वेबसाइट iprc.gov.in/iprc/ वर जा. - सर्च करून ‘करिअर्स’ सेक्शनवर क्लिक करा. - नवीन पानावरील इन्स्ट्रक्शन्स वाचा आणि ‘अप्लाय ऑनलाइन’ लिंकवर क्लिक करा. - नव्या विंडोमध्ये तुम्हाला ज्या पोस्टसाठी अर्ज करायचाय त्यावर क्लिक करा. - त्यानंतर दिलेल्या सूचनेनुसार अर्ज भरा. - डॉक्युमेंट्स अपलोड करून अप्लिकेशन फी भरा. - फॉर्म सबमीट करून कन्फर्मेशन पेजची कॉपी घ्या. तब्बल 80,000 पगार आणि थेट सुप्रीम कोर्टात नोकरी; खुद्द न्यायाधीश घेणार मुलाखत किती आहे फी? टेक्निकल असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्यांना अर्ज फी म्हणून 750 रुपये भरावे लागतील. दुसरीकडे, टेक्निशियन ‘बी’, ड्राफ्ट्समन ‘बी’, फायरमन ‘ए’, हलके वाहन चालक ‘ए’ आणि अवजड वाहन चालक ‘ए’ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 500 रुपये भरावे लागतील. वेतन टेक्निकल असिस्टंट पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल 7 नुसार 44,900 ते 1,42,400 वेतन दिले जाईल. टेक्निशियन-बी पदांसाठी निवडलेल्यांना पे मॅट्रिक्स लेव्हल 3 नुसार 21,700– 69,100 दरम्यान वेतन दिले जाईल.