जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / नवोदितांना BSNL मध्ये काम करण्याची संधी, 'या' पद्धतीनं करा लगेच अर्ज!

नवोदितांना BSNL मध्ये काम करण्याची संधी, 'या' पद्धतीनं करा लगेच अर्ज!

प्रतिका्त्मक फोटो

प्रतिका्त्मक फोटो

भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलमध्ये काम करण्याची विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 18 एप्रिल :  भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही भारत सरकारची अधिकृत टेलिकॉम कंपनी आहे. अनेक खासगी कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये आजही या कंपनीनं आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. या कंपनीमध्ये वेळोवेळी अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. आता, बीएसएनलच्या उत्तराखंड टेलिकॉम सर्कल डेहराडूननं अ‍ॅप्रेंटिसशिप प्रोग्रॅमसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2023पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. ‘स्टडी कॅफे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. काय आहे संधी? बीएसएनएल 2023 भरती अधिसूचनेनुसार, उमेदवार सरकारद्वारी पोर्टलच्या माध्यमातून 25 एप्रिल 2023 पर्यंत किंवा त्या पूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज भरताना ते नमूद केलेल्या बिझनेस एरिआपैकी एकाला प्राधान्यक्रम देऊ शकतात. असं असलं तरी त्यांना उत्तराखंड सर्कलमधील कोणत्याही ठिकाणी कामासाठी पाठवलं जाऊ शकते. नॉन-इंजिनीअर/नॉन-टेक्निकल स्ट्रीममधील उमेदवार संलग्न नमुन्यातील तपशीलांसह adt.admn2@gmail.com या ईमेलवर मेल पाठवून अर्ज करू शकतात. निवडलेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची माहिती त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर दिली जाईल. इच्छुक उमेदवार BOAT’s Govt द्वारे अर्ज करू शकतात त्यांना अर्ज शुल्क लागणार नाही. इतर कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा अडचणींसाठी इच्छुक उमेदवार adt.admn2@gmail.com वर ईमेल करू शकतात.

    News18लोकमत
    News18लोकमत

    पोस्ट, संख्या आणि कार्यकाळ: बीएसएनएल उत्तराखंड टेलिकॉम सर्कलमध्ये अ‍ॅप्रेंटिसशिप मिळवणाऱ्या उमेदवारांची एक वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती केली जाईल. अ‍ॅप्रेंटिसशिप अ‍ॅक्ट 1961 अंतर्गत असलेल्या या पदांसाठी एकूण 21 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा सर्कल ऑफिस डेहराडून, डेहराडून बिझनेस एरिया, हंडवार बिझनेस एरिया आणि नैनिताल बिझनेस एरियामध्ये आहेत. वयोमर्यादा: बीएसएनएल 2023 भरती अधिसूचनेनुसार, अ‍ॅप्रेंटिसशिप प्रोग्रॅमसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावं. पात्रता निकष: बीएसएनएल 2023 भरती अधिसूचनेनुसार, फक्त भारतीय नागरिक अ‍ॅप्रेंटिसशिप प्रोग्रॅमसाठी अर्ज करू शकतात. इच्छुकांनी 31 मार्च 2020 नंतर इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजी क्षेत्रातील (टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/रेडिओ/कॉम्प्युटर/इंस्ट्रुमेंटेशन/आयटी) पदवी/पदविका पूर्ण केलेली पाहिजे किंवा AICTE किंवा GOI द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे. पासपोर्ट ऑफिसमध्ये उच्च पदावर काम करण्याची सुवर्णसंधी; मिळेल लाखो रुपये पगार निवड प्रक्रिया: उत्तराखंड टेलिकॉम सर्कलमधील अ‍ॅप्रेंटिसशिप प्रोग्रॅमसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया त्यांच्या पदवी अभ्यासक्रमात (टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल) आणि पदविका अभ्यासक्रमात मिळवलेल्या गुणांच्या अंतिम टक्केवारीच्या आधारावर होईल. ज्या उमेदवारांनी पात्रता निकष पूर्ण केले आहेत. त्यांना पोर्टल किंवा ईमेलद्वारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. मासिक भत्ता: अ‍ॅप्रेंटिसशिप प्रोग्रॅमसाठी निवड झालेल्या पदवीधर उमेदवारांना महिन्याला नऊ हजार मासिक भत्ता मिळेल. पदविका उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना आठ हजार रुपये मासिक भत्ता मिळेल. फक्त 100 रुपयांत करा ‘हे’ कोर्स आणि कमावा हजारो रूपये, पाहा Video अर्ज कसा करावा? बीएसएनएल 2023 भरती अधिसूचनेनुसार, उमेदवार सरकारद्वारी पोर्टलच्या माध्यमातून 25 एप्रिल 2023पर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज भरताना ते नमूद केलेल्या बिझनेस एरिआपैकी एकाला प्राधान्यक्रम देऊ शकतात. असं असलं तरी त्यांना उत्तराखंड सर्कलमधील कोणत्याही ठिकाणी कामासाठी पाठवलं जाऊ शकते. नॉन-इंजिनीअर/नॉन-टेक्निकल स्ट्रीममधील उमेदवार संलग्न नमुन्यातील तपशीलांसह adt.admn2@gmail.com या ईमेलवर मेल पाठवून अर्ज करू शकतात

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: BSNL , career
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात