मुंबई, 24 जानेवारी: कोणत्याही कंपनीत जॉब मिळवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा रेझ्युमे म्हणजेच बायोडेटा तिथल्या वरिष्ठांना द्यावा लागतो. तुमच्या बायोडेटामधील माहितीनुसार तुमच्याबद्दल प्रत्येक माहिती समोरच्यांना समजते. मात्र अनेकदा कंपनीत तुमचा एकच बायोडेटा नसतो. वरिष्ठांना हजारो बायोडेटा मिळत असतात. त्यामुळे तुमचा बायोडेटा पूर्णपणे वाचला जाईलच असं नाही. त्यामुळे अनेकांना जॉब मिळू शकत नाही. मात्र तुम्हाला जॉब हवा असेल तर बायोडेटासह Cover Letter देणंही महत्त्वाचं आहे. अगदी फ्रेशर्सपासून ते प्रोफेशनल्सपर्यंत सर्वांना Cover लेटर आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला हे Cover Letter नसेल त जॉब मिळतो का हे सांगणार आहोत.
कव्हर लेटर नसेल तर जॉब मिळतो?
काही एक्सपर्ट्सच्या मते सर्वच कंपन्यांमध्ये कव्हर लेटरची मागणी नसते. काही कंपन्या अशाही असतात ज्या फक्त तुम्हाला तुमच्या Resume वरून नोकरी देतात. मात्र बहुतांश कंपन्यांमध्ये कव्हर लेटर द्यावं लागतं. तसंच कव्हर लेटर दिल्यामुळे तुमचं इम्प्रेशन तयार होतं आणि तुम्हाला जॉब मिळायचे चान्सेस वाढतात. एकूणच काय तर कहर लेटर तयार करण्या आधी त्या कंपनीबाबत संपूर्ण रिसर्च करा.
सुरुवातीला करा हे काम
कव्हर लेटर पाठ्वण्याआधी LinkedIn ला त्या कंपनीच्या आधीच्या किंवा आताच्या कर्मचाऱ्यांशी कनेक्ट व्हा आणि त्यांना कव्हर लेटर पाठवावं की नाही हे विचारा. यामुळे तुम्हाला कोणत्या कंपनीत कव्हर लेटर पाठवावं आणि कोणत्या पाठवू नये हे कळेल. तसंच तुमचे कनेक्शन्स वाढण्यातही मदत होईल.
कव्हर लेटरमध्ये या चुका करू नका
कंपनीबद्दल माहिती न घेणे
पोझिशन आणि कंपनीच्या गरजेनुसार कव्हर लेटर लिहिण्यासाठी संशोधन आवश्यक आहे. कंपनीचे संशोधन (how to research for company) केल्याने तुम्हाला त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी ओळखण्यात मदत होते आणि कोणती माहिती समाविष्ट करायची हे निर्धारित करण्यात मदत होते. कव्हर लेटर लिहिण्यासाठी उत्तम संशोधन हा सहसा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. मात्र अनेकदा माहिती न घेता कव्हर लेटर बनवल्यामुळे नोकरी हातची जाऊ शकते. म्हणूनच कंपनीची आणि पोस्टची संपूर्ण माहिती घेऊनच कव्हर लेटर बनवणं आवश्यक आहे.
तुमच्यातील क्षमता न लिहिणे
तुमचे कव्हर लेटर तुमची सर्वात मोठी ताकद असलेली कौशल्ये हायलाइट (How to highlight Skills in Cover letter) करत आहे का हे बघणे आवश्यक आहे.तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्याच्याशी संबंधित आहे का हेही बघणे महत्त्वाचे आहे. ही कौशल्ये तुमच्यासाठी एक ताकद आहेत हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या अनुभवांचा आणि कर्तृत्वाचा विचार करा. जे तुम्हाला भूमिकेत यशस्वी होण्यास मदत करणार नाहीत अशा कौशल्यांचा उल्लेख करणे टाळा.
कव्हर लेटरमध्ये पगाराबद्दल माहिती लिहिणे
तुमचा कव्हर लेटर तुमच्या वर्तमान पगाराची किंवा पगाराच्या अपेक्षांवर चर्चा करण्यासाठी योग्य जागा नाही जोपर्यंत नियोक्ता तुम्हाला असे करण्यास सांगत नाही. पगाराच्या अपेक्षांबद्दल खूप लवकर बोलल्याने असे दिसते की तुम्हाला कंपनीला कसा फायदा होऊ शकतो यापेक्षा नोकरीतून मिळणाऱ्या फायद्यांमध्ये तुम्हाला अधिक रस आहे. म्हणून कव्हर लेटरमध्ये पगाराबद्दल लिहू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job, Job alert