जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / नुसतं नाव ऐकूनच थरथर कापतात! बस कंटक्टरची मुलगी ते IPS शालिनी अग्निहोत्रींचा प्रेरणादायी प्रवास

नुसतं नाव ऐकूनच थरथर कापतात! बस कंटक्टरची मुलगी ते IPS शालिनी अग्निहोत्रींचा प्रेरणादायी प्रवास

नुसतं नाव ऐकूनच थरथर कापतात! बस कंटक्टरची मुलगी ते IPS शालिनी अग्निहोत्रींचा प्रेरणादायी प्रवास

मुंबई, 22 ऑगस्ट : ज्यांच्या नुसत्या नावानंही गुन्हेगारांचे हात पाय लटपटायला लागतात अशा एका महिला पोलीस IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. लहानपणापासून पोलिसात जाण्याचं आणि देशसेवा करण्याचा निश्चय केला होता. सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं की नंतर विचार बदलेलं पण हे मनात इतकं पक्क होतं की या ध्येयाशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. शालिनी अग्निहोत्री यांचा लहानपणापासून ते IPSच्या स्वप्नपूर्तीपर्यंतचा प्रवास कसा होता? शालिनी यांचा जन्म 14 जानेवारी 1989 सालचा. लहानपणापासून आई-वडिलांनी अगदी कोणत्याही गोष्टीची चणचण भासू दिली नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 ऑगस्ट : ज्यांच्या नुसत्या नावानंही गुन्हेगारांचे हात पाय लटपटायला लागतात अशा एका महिला पोलीस IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. लहानपणापासून पोलिसात जाण्याचं आणि देशसेवा करण्याचा निश्चय केला होता. सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं की नंतर विचार बदलेलं पण हे मनात इतकं पक्क होतं की या ध्येयाशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. शालिनी अग्निहोत्री यांचा लहानपणापासून ते IPSच्या स्वप्नपूर्तीपर्यंतचा प्रवास कसा होता? शालिनी यांचा जन्म 14 जानेवारी 1989 सालचा. लहानपणापासून आई-वडिलांनी अगदी कोणत्याही गोष्टीची चणचण भासू दिली नाही. शालिनी यांचे वडील बसचे कंटक्टर होते. त्यांनी शालिनी यांना हवी असणारी प्रत्येक गोष्टं त्यांचा हट्ट पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केला. शाळेतही मेहनती आणि जिद्द असणारी विद्यार्थी म्हणून त्यांनी कौतुकाची थाप मिळवली. हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाला इथे त्यांचं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर हिमाल प्रदेश अॅग्रिकल्चर युनिवर्सिटीमधून डिग्री घेतली. हे वाचा- नेटवर्क नाही म्हणून गावापासून दूर जंगलात येऊन केला ऑनलाइन क्लास IPS परीक्षा सहज पास होणं कठीण आहे हे मनात ठेवून ती पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करायची हा निश्चय मनाशी पक्क केला आणि त्या दिवशेनं वाटचाल करण्यास सुरुवात केली. 2011 मध्ये परीक्षा दिली 2012 मध्ये मुलाखत देऊन शालिनी यांनी भारतात 285 व्या क्रमांक मिळवला होता. हैदराबादमध्ये झालेल्या ट्रेनिंगमध्ये त्या टॉपर होत्या. त्यावेळी सर्वश्रेष्ठ ट्रेनीचा पुरस्कारही त्यांनी मिळवला. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कुल्लू पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळला. आज त्यांच्या नुसत्या नावानं गुन्हेगारही कचरतात आणि थरथर कापतात. त्यांनी मद्य, आणि अवैद्य औषध, गांजा, नशेच्या वस्तुंविरोधात मोहीम हाती घेतली. यामध्ये त्यांना मोठं यशही मिळालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: career , upsc
  • First Published :
जाहिरात
जाहिरात