• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Job Interview Tips: स्वतःचं Introduction देताना कधीही करू नका 'या' चुका; अशा पद्धतीनं द्या योग्य उत्तर

Job Interview Tips: स्वतःचं Introduction देताना कधीही करू नका 'या' चुका; अशा पद्धतीनं द्या योग्य उत्तर

या प्रश्नाचं योग्य उत्तर कसं असावं हे जाणून घेऊया.

 • Share this:
  मुंबई, 30 ऑगस्ट: कोणत्याही नोकरीच्या मुलाखतीदरम्यान (Job Interview) विचारला जाणार सर्वात महत्त्वाचा आणि कॉमन प्रश्न म्हणजे ' स्वतःबद्दल माहिती द्या" (Tell Me about Yourself answer). हा प्रश्न अनेकांना अगदी सोपा आणि सहज वाटू शकतो. त्यामुळे अनेकजण या प्रश्नाचं उत्तर अभ्यास न करता देतात. बरेचदा यामुळे त्यांना जॉब (Latest jobs) मिळू शकत नाही. पण या प्रश्नामध्ये इतकं कठीण आहे तरी काय? आपल्याबद्दल स्वतःबद्दल माहिती देण्यात कसलं आलंय रॉकेट सायन्स? अशे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.  ' स्वतःबद्दल माहिती द्या" (how to give write answer of Tell me about yourself) या एका प्रश्नावर तुमची संपूर्ण मुलाखत (Job Interview tips) अवलंबून असते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर कसं असावं हे जाणून घेऊया. हा प्रश्न विचारण्यामागचा नेमका हेतू काय? साधारणतः मुलाखत घेणारं पॅनल तुमच्यातील कॉन्फिडेंस लेवल आणि तुमचं कम्युनिकेशन स्किल्स तपासून बघण्यासाठी हा प्रश्न विचारतं. तसंच या प्रश्नातून तुमच्याबद्दल, तुमच्या स्किल्सबाबत आणि तुमच्या ज्ञानाबाबत काही गोष्ट उघड होतात. प्रश्नाचं उत्तर देताना कोणत्या चुका होतात? उत्तर देताना अनेक ठिकाणी थांबून किंवा अडखळून बोलणे उत्तर देताना तोतरेपणानं बोलणे पालकांबद्दल अनावश्यक माहिती सांगणे. तुमच्या नावानंतर तुमच्या छंदांबद्दल सांगणे तुमच्या प्रॉपर्टीबद्दल आणि घराबद्दल सांगणे तुमच्या खासगी आयुष्याबद्दल सांगणे. अतिआत्मविश्वासानं उत्तर देणे अशा प्रकारच्या काही चुका केल्या तर तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता नसते. हे वाचा - AAI Recruitment: एयरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये पदभरती; 1 लाख रुपये मिळणार पगार अशा पद्धतीनं द्या योग्य उत्तर प्रश्न विचारल्यानंतर सुरुवातीला मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला काय सांगायचं आहे याबाबत मनात सूची तयार करून घ्या. यानंतर अगदी 30 से 45 सेकंदात तुमच्याबद्दल आणि शिक्षणाबद्दल माहिती द्या. यानंतर तुम्ही कोणत्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलं असेल तर त्याबद्दल माहिती द्या. यानंतर तुम्ही ज्या पदाच्या मुलाखतीला आले आहेत त्या पदाशी संबंधित तूंच्याकडं असणाऱ्या स्किल्सबद्दल सांगा. कुटुंबाबद्दल माहिती देताना घरी कोण-कोण आहेत एवढच सांगा. त्यापेक्षा अधिक माहितीचा उपयोग नाही. पूर्ण नाव → तुम्ही कोणत्या शहरातील आहात → कोणत्या बोर्डातून 10 आणि 12 टक्के टक्के → कॉलेजची शैक्षणिक पात्रता या पाधहतीना उत्तर द्या. उत्तर देताना नम्रपणानं द्या कुठल्याही प्रकारची खोटी माहिती देऊ नका. यामुळे तुमचा जॉब धोक्यात येऊ शकतो.
  Published by:Atharva Mahankal
  First published: