Home /News /career /

Interview ला जाताना Resume विसरलात? चिंता नको. अवघ्या 10 मिनिटांमध्ये असा बनवा Resume

Interview ला जाताना Resume विसरलात? चिंता नको. अवघ्या 10 मिनिटांमध्ये असा बनवा Resume

तुम्ही अवघ्या 10 मिनिटांमध्ये Resume तयार करू शकता.

तुम्ही अवघ्या 10 मिनिटांमध्ये Resume तयार करू शकता.

आज आम्ही तुम्हाला अशा काही Resume टिप्स (Resume Tips) आणि सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही अवघ्या 10 मिनिटांमध्ये Resume तयार करू शकता.

  मुंबई, 05 जानेवारी: कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेक जण नोकरीसाठी कंपन्यांमध्ये Resume देत आहेत. चांगली नोकरी मिळावी (How to get a good job) म्हणून मुलाखतीची तयारी करत आहेत. पण कोणतीही नोकरी मिळवायची असेल तर यासाठी Resume महत्त्वाचा (How to make good Resume) असतो. एकदा तुमचा Resume पुढील कंपनीला आवडला (How to make impressive resume) की नोकरी पक्की होते. पण विचार करा जर तुम्ही एखाद्या मुलाखतीला गेलात आणि Resume विसरलात तर? असं झालंच तर अजिबात टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही Resume टिप्स (Resume Tips) आणि सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही अवघ्या 10 मिनिटांमध्ये Resume तयार (How to make instant Resume) करू शकता. चला तर मग जाणून घेऊया. स्मार्टफोनमधील अप्लिकेशनचा करा वापर अवघ्या 10 मिनिटांमध्ये Resume बनवण्यासाठी तुमच्या फोनमधील नोटपॅड किंवा MS-office ही अप्लिकेशन असेल तर ती ओपन करा. यानंतर तुमचा Resume म्हणजेच तुमच्याबद्दलची माहिती यात लिहिण्यास सुरुवात करा. सुरुवातीला तुमचं नाव बोल्डमध्ये लिहा. यानंतर खाली पॉईंटनुसार पुढील गोष्टी लिहिण्यास सुरुवात करा. Government Jobs: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुबंईत 'या' पदांसाठी करतेय भरती Objective लिहा लक्षात ठेवा तुमच्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे कोणत्याही गोष्टी लिहिताना अगदी मोजक्या शब्दांमध्ये आणि सुटसुटीत लिहा. Objective लिहिताना सात ते आठ शब्दांमध्ये तुमचं म्हणणं मांडा. अनुभवाविषयी लिहा या नोटपॅडमध्ये सुरुवातीला तुम्हला असलेल्या अनुभवाविषयी लिहा. तुमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे तुम्ही काम करत असलेल्या मागील कंपनीबद्दल आणि तिथल्या कामाच्या कालवधीबद्दल लिहा. जर तुम्हाला कुठल्या इंटर्नशिपचा अनुभव असे तर तिथे नक्की काय काम केलत ते मोजक्या शब्दात लिहा. अनुभव लिहिताना मागील कंपनीतील पोस्ट लिहिण्यास विसरू नका. Skills बद्दल लिहा कमीत कमी वेळेत Resume बनवताना तुम्ही सर्वच गोष्टी लिहू शकत नाही. त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी लिहा. यामध्ये तुमच्यातील स्किल्सबद्दल लिहा. काही विशेष कोर्सेस केले असतील तर त्यांची माहिती द्या. तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची असते. कॉन्टॅक्टची माहिती अचूक द्या Resume बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा फोन नंबर आणि ई-मेल आयडी. ही माहिती तुमच्या Resumeमध्ये नसेल तर तुम्हाला नोकरी मिळणं कठीण होईल. म्हणूनच सर्वात आधी तुमचा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर अचूक लिहा. ज्यामुळे तुम्हाला संवाद साधण्यात कंपनी यशस्वी होईल. नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करताय? मग असे कमवा भरघोस पैसे हे काम करायला विसरू नका तुमचा रेशीम पुणे टाईप करून झाला की तो पुन्हा एकदा चेक करायला विसरू नका. जर Resume च्या शेवटी सेल्फ डिक्लरेशन लिहिण्यास विसरू नका. यानंतर Resume जर हार्डकॉपीमध्ये द्यायचा असेल तर रेशीम ची प्रिंट घ्या किंवा ई-मेल आयडीवर सेंड करा. लक्षात ठेवा Resume बनवण्यासाठी एक चांगला इन्स्टंट फॉरमॅट रेडी ठेवा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Tips

  पुढील बातम्या