मुंबई, 08 मे: इंटर्नशिप म्हंटली की आपल्या डोक्यात पहिला विचार येतो तो म्हणजे कोणत्याही सॅलरीशिवाय काम करणं आणि शिकत राहणं. बरेचदा अनेक कंपन्या फ्रीमध्ये इंटर्न्स ठेवतात आणि त्यांच्याकडून अनुभव देण्याच्या नावावर काम करवून घेतात. भारतात जॉब्ससाठी वणवण भटकत असताना अनेक तरुणही अशीच फ्रीमध्ये इंटर्नशिप करतात. आता तुम्ही म्हणाल आता गैर काय? पण थांबा. आज आम्ही तुम्हाला जी माहिती देणार आहोत ती वाचून तुम्हाला कदाचित धक्का बसेल पण हे खरंय. अनेक टेक कंपन्या त्यांच्या इंटर्नला इतर क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त पगार देत आहेत. एका रिपोर्ट मधून असा खुलासा झाला आहे. काय सांगतो हा रिपोर्ट बघूया.
सोशल मीडियावर इंटर्न आणि फ्रेशर्सच्या पगारावर अनेकदा वाद होतात (ट्रेंडिंग टॉपिक्स). बहुतेक लोक त्यांच्या सुरुवातीच्या पॅकेजवर नाखूष दिसतात. अनेक वर्षांच्या अनुभवानंतरही तो 5-6 लाखांच्या पॅकेजवर काम करत असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. पण अनेक टेक कंपन्या त्यांच्या इंटर्नला इतर क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त पगार देत आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? मोठी खूशखबर! भारताच्या न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशनमध्ये बंपर भरतीची घोषणा; सॅलरी बघून विश्वास बसणार नाही इंटर्न सॅलरी रिपोर्ट बघून व्हाल शॉक Glassdoor ने इंटर्न पगारावर एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. लोक त्यांच्या कंपनीची माहिती glassdoor.co.in वर मिळवू शकतात. त्यांच्या अहवालातील पगार आणि पॅकेज माहिती यूएस आधारित इंटर्नसाठी आहे. त्याची भारताशी तुलना होऊ शकत नाही. अमेरिकेत इंटर्नला 7 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज दिले जाते. पण भारतात इंटर्नशिप फ्रीमध्ये करा असंच सांगण्यात येतं. बसला ना धक्का? IPS Success Story: 12वी झाले नापास, वेळप्रसंगी रस्त्यावरही झोपले अन् झाले सिंघम; दबंग ऑफिसरची कहाणी भारतात इंटर्नचा पगार भारतातील बहुतेक इंटर्न आणि फ्रेशर्सना समान पॅकेज ऑफर केले जाते. बहुतेक कंपन्या 15,000 रुपये मासिक पगारावर इंटर्न आणि फ्रेशर्सची नियुक्ती करतात. काही भागात फ्रेशर्सना फक्त 5-10 हजार रुपये मिळतात. त्याच वेळी, मोठ्या संख्येने लोक म्हणतात की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या महिन्यांत फुकट काम केलं आणि तरीही त्यांना जॉब मिळू शकला नाही.