मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IBPS SO Recruitment: IBPS तर्फे विशेषज्ञ अधिकारी या पदांच्या तब्बल 1828 जागांसाठी मोठी भरती; लगेच करा अप्लाय

IBPS SO Recruitment: IBPS तर्फे विशेषज्ञ अधिकारी या पदांच्या तब्बल 1828 जागांसाठी मोठी भरती; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर: बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (Institute of Banking Personnel Selection) तर्फे लवकरच विशेतज्ञ अधिकारी पदाच्या तब्बल 1828 जागांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IBPS SO Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. I.T. Officer (स्केल- I), एग्रीकल्चर फील्ड ऑफिसर (स्केल- I), राजभाषा अधिकारी (स्केल- I), लॉ ऑफिसर (स्केल- I), HR / कार्मिक अधिकारी (स्केल- I), मार्केटिंग ऑफिसर (स्केल- I) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (How to apply for IBPS SO Recruitment 2021) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

I.T. Officer (स्केल- I) (I.T. Officer)

एग्रीकल्चर फील्ड ऑफिसर (स्केल- I) (Agricultural Field Officer)

राजभाषा अधिकारी (स्केल- I) (Rajbhasha Adhikari)

लॉ ऑफिसर (स्केल- I) (Law Officer)

HR / कार्मिक अधिकारी (स्केल- I) (HR/Personnel Officer)

मार्केटिंग ऑफिसर (स्केल- I) (Marketing Officer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

I.T. Officer (स्केल- I) (I.T. Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 4 वर्षांची अभियांत्रिकी / संगणक विज्ञान / संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन मधील पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

एग्रीकल्चर फील्ड ऑफिसर (स्केल- I) (Agricultural Field Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी / फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशास्त्र / मत्स्य विज्ञान / मत्स्यपालन / कृषी (पदवी) विपणन आणि सहकार/सहकार आणि बँकिंग/कृषी-वनीकरण/वनीकरण/कृषी जैवतंत्रज्ञान/अन्न विज्ञान/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/अन्न तंत्रज्ञान/दुग्ध तंत्रज्ञान/कृषी अभियांत्रिकी/रेशीम.मधील 4 वर्षांची पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

राजभाषा अधिकारी (स्केल- I) (Rajbhasha Adhikari) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर विषय म्हणून इंग्रजी आणि हिंदीसह संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी.घेतली असणं आवश्यक आहे.

लॉ ऑफिसर (स्केल- I) (Law Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्यातील बॅचलर पदवी (LLB) आणि बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली असणं आवश्यक आहे.

AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई इथे 90 जागांसाठी भरती

HR / कार्मिक अधिकारी (स्केल- I) (HR/Personnel Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीधर आणि दोन वर्षे पूर्ण वेळ पदव्युत्तर पदवी किंवा कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / एचआर / एचआरडी / सामाजिक कार्य / कामगार कायदा यामधील दोन वर्षांचा पूर्ण वेळ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.

मार्केटिंग ऑफिसर (स्केल- I) (Marketing Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीधर आणि दोन वर्षे पूर्ण वेळ MMS (मार्केटिंग)/ दोन वर्षे पूर्ण वेळ MBA (मार्केटिंग)/ दोन वर्षे पूर्ण वेळ PGDBA/ PGDBM/ PGPM/ PGDM मार्केटिंगमधील स्पेशलायझेशन केलं असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे वयवर्षे 20 ते 30 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क

General/OBC/PWBD/EXSM उमेदवारांसाठी - 850/-.रुपये प्रतिमहिना

SC/ST उमेदवारांसाठी - 175/-.रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/crpspxinov21/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published: