• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • GMC Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे 64 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

GMC Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे 64 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

मुलाखतीची तारीख 22 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    नागपूर, 20 ऑक्टोबर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर (Indira Gandhi Government Medical College, Nagpur) इथे लवकरच 64 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना (GMC Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 22 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 64 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी MD/DM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. Pune Job Alert: भारती विद्यापीठ पुणे इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त मुलाखतीचा पत्ता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठाता दालनात. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 ऑक्टोबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.gmcnagpur.org/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: