मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: ठाणे महानगरपालिकेत 'या' पदासाठी नोकरीची संधी; वेळ निघून जाण्याआधी करा अप्लाय

Job Alert: ठाणे महानगरपालिकेत 'या' पदासाठी नोकरीची संधी; वेळ निघून जाण्याआधी करा अप्लाय

वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या तरुण -तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या तरुण -तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या तरुण -तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

ठाणे, 20 जून: राज्यातील (Jobs in Maharashtra) होतकरू तरुण-तरुणींसाठी ठाणे महानगरपालिकेत (Thane Mahanagarpalika Recruitment 2021) पदभरती होणार आहे. या पदभरतीसाठीची अधिसूचना नुकतीच जारी (Job Alert) करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer), लॅब तंत्रज्ञ (Lab Technician), फार्मासिस्ट (Pharmacist), प्रोग्राम सहाय्यक (Program Assistant). या पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामुळे  वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या तरुण -तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एकूण एकूण 42 जागांसाठी ही पदभरती होणार आहे.

काय आहे पोस्ट

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, प्रोग्राम सहाय्यक या पदांसाठी पद्भारती होणार आहे. एकूण 42 जागांसाठी ही पदभरती होणार आहे.

हे वाचा - अभियांत्रिकी प्रवेशासाठी CET घेणार नाही, दहावीच्या गुणांवर प्रवेश - उदय सामंत

इतका मिळणार पगार

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी -- 60,000/- प्रतिमहिना

प्रयोगशाळा तंत्रज्ञ -- 29,400/- प्रतिमहिना

औषध निर्माता -- 19584/-  प्रतिमहिना

प्रोग्राम असिस्टंट CQAC -- 19,339/- प्रतिमहिना

शैक्षणिक पात्रता

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी-  MBBS पदवी तसंच शासकीय रुग्नालयातील अनुभव असल्यास प्राधान्य

प्रयोगशाळा तंत्रज्ञ - BSC विथ DMLTअनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

औषध निर्माता -  D PHARM/B PHARM ची पदवी

प्रोग्राम असिस्टंट CQAC- कोणत्याही शाखेतील पदवी आणि MSCIT असल्यास प्राधान्य.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता  - सार्वजनिक आरोग्य विभाग, चोथा मजला, महापालिका भवन, पाचपाखाडी, ठाणे

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख - 29 जून 2021

First published:

Tags: Jobs, Thane (City/Town/Village)