जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; 'या' जागांसाठी आताच करा अप्लाय

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; 'या' जागांसाठी आताच करा अप्लाय

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी

या पदासाठी पात्रता, रिक्त जागा, अर्ज कसा करायचा, वेतन किती असेल व वयोमर्यादा काय आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05, जून: भारतीय रेल्वेने ग्रुप जनरल मॅनेजर पदासाठी अर्ज मागवले आहेत. याअंतर्गत उमेदवाराची तीन वर्षांसाठी निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवाराला नवी दिल्लीमध्ये पोस्टिंग मिळेल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 55 वर्षांपेक्षा जास्त नसावं. या पदासाठी पात्रता, रिक्त जागा, अर्ज कसा करायचा, वेतन किती असेल व वयोमर्यादा काय आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. ‘स्टडी कॅफे’ने याबद्दल वृत्त दिलंय. पदाचे नाव व रिक्त जागा IRCTC रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, ग्रुप जनरल मॅनेजर पदासाठी प्रतिनियुक्तीच्या आधारावर एक रिक्त जागा भरली जाणार आहे. वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा 55 वर्षे आहे. वय निश्चित करण्यासाठी अर्जाची शेवटची तारीख 3 जुलै 2023 कट ऑफ असेल. NIRF Ranking 2023: मुलांना चांगलं शिक्षण द्यायचंय ना? मग NIRF रँकिंगनुसार ‘या’ आहेत देशातील टॉप-10 युनिव्हर्सिटीज पात्रता या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार भारतीय रेल्वेचे IRSME अधिकारी असणं आवश्यक आहे. अनुभव: उमेदवारांनी 37400-6700 रुपयांवर GP-10000 सोबत 7 व्या CPC नुसार किंवा CDA पॅटर्नच्या लेव्हल-14 वर काम केलेलं असावं. अथवा, पात्र उमेदवारांनी 37400-8700 पगारावर 7व्या GP-1000 सह सातवे सीपीसी किंवा लेव्हल 13 वर सीडीए पॅटर्नने काम केलेलं असावं. उमेदवारांनी 8700 GP किंवा Level-13 मध्ये किमान 3 वर्षे काम केलेलं असावं. कार्यकाळ निवड झालेल्या उमेदवाराला पहिल्यांदा तीन वर्षांसाठी नोकरी दिली जाईल किंवा आयआरसीटीसीने तत्परतेने नोकरीत कायम करण्यासंबंधीच्या नियमांत बदल केल्यानुसार जो कार्यकाळ असेल तो आणि तीन वर्षं यापैकी जो कार्यकाळ आधी संपेल तोपर्यंत उमेदवाराला नोकरी करता येईल. IBPS RRB Recruitment 2023: आली सरकारी नोकरी; 1-2 नव्हे तब्बल 8594 जागांसाठी मेगाभरती; ही घ्या अर्जाची लिंक नोकरीचे ठिकाण निवडलेल्या उमेदवाराला नवी दिल्ली येथे नियुक्त केले जाईल. संस्थेच्या आवश्यकतांनुसार पोस्टिंग बदलू शकतं. पगार निवडलेल्या उमेदवाराला या पदावर नोकरीदरम्यान पॅरेंट डिपार्टमेंट वेतन व प्रतिनियुक्ती वेतन मिळेल. निवडलेल्या उमेदवाराला मेडिकल भत्ता, फिटनेस भत्ता आणि लागू होणारा इतर भत्तादेखील मिळेल. UPSC Exam Tips: IAS, IPS व्हायचंय ना? मग UPSC परीक्षेत ‘या’ चुका कधीच करू नका; हातचा जाईल जॉब निवड प्रक्रिया IRCTC रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांची निवड रेल्वे मंत्रालयाच्या प्रतिनियुक्ती नियमांनुसार केली जाईल. अर्ज कसा करायचा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या नमुन्यात अर्ज भरणं आवश्यक आहे. उमेदवारांना नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटो, पात्रता पुरावा, व्हिजिलन्स हिस्ट्री, D&AR क्लियरन्स आणि मागील 3 वर्षांचा APAR ही कागदपत्रं जोडावी लागतील. योग्य चॅनलद्वारे त्यांना अर्ज बोर्डाकडे पाठवावे लागतील, तिथून ते नवी दिल्लीतील IRCTC कॉर्पोरेट कार्यालयात पाठवले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जुलै 2023 आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात