मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मोठी बातमी! महिलांबाबत Navy नं घेतला महत्त्वाचा निर्णय; University Entry Schemeसाठी करता येणार अर्ज

मोठी बातमी! महिलांबाबत Navy नं घेतला महत्त्वाचा निर्णय; University Entry Schemeसाठी करता येणार अर्ज

महिलांना करता येणार अर्ज

महिलांना करता येणार अर्ज

आतापर्यंत फक्त पुरुषांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ महिलाही घेऊ शकतील आणि त्या इंडियन नेव्हीमध्ये नोकरीही मिळवू शकतील.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 नोव्हेंबर:  भारतीय नौदलाने महिलांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सैन्यदलात महिलांच्या प्रवेशासाठी आणखी एक बंद दरवाजा उघडण्यात आला आहे. आतापर्यंत फक्त पुरुषांनाच या ठिकाणी प्रवेश घेता येत होता. नौदलाने नेव्ही युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम महिलांसाठीही सुरू केली आहे. आतापर्यंत फक्त पुरुषांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ महिलाही घेऊ शकतील आणि त्या इंडियन नेव्हीमध्ये नोकरीही मिळवू शकतील.

केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. आता नौदलाच्या काही विभागांमध्ये नेव्ही युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमद्वारे महिलाही नोकरीसाठी अर्ज करू शकतात, असं या संदर्भातील एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान केंद्राने सांगितलं. युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमच्या माध्यमातून नेव्हीच्या एक्झिक्युटिव्ह ब्रँच जनरल सर्व्हिस (X) केडर, आयटी, इंजिनीअरिंग व इलेक्ट्रिकल शाखांमध्ये महिलांसाठी नोकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे, असं सरकारने हायकोर्टात सांगितलं.

MPSC Bharti: महिन्याचा 2,18,000 रुपये पगार; अधिकारी पदांसाठी MPSC ची मोठी घोषणा; करा अर्ज

'महिलांशी भेदभाव का?'

अॅटर्नी जनरल कुश कालरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सैन्य भरतीत महिलांबाबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर हायकोर्टाने सरकारला विचारलं की, सरकारने पुरुषांप्रमाणेच महिलांनाही समान संधी देण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत?

याला उत्तर देताना केंद्राची बाजू मांडणारे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा म्हणाले की, याचिकेत उपस्थित केलेला मुद्दा आधीच सोडवला गेला आहे. सरकारने इंडियन नेव्ही युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमच्या माध्यमातून महिलांना नौदलाच्या आयटी, टेक्निकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल ब्रँच, एक्झिक्युटिव्ह ब्रँच जनरल सर्व्हिस केडरमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे.

Maharashtra Police Bharti: फक्त डॉक्युमेंट्स नाहीत म्हणून रिजेक्ट होणं परवडणार नाही गड्यांनो; आताच रेडी ठेवा ही लिस्ट

नौदलात भरती कधी होणार?

अॅडिशनल सॉलिसिटर जनरल शर्मा यांनी आपल्या युक्तिवादांना बळ देण्यासाठी केंद्राने तयार केलेल्या नोटिसाही न्यायालयात दाखवल्या. एक नोटीस नेव्ही शॉर्ट सर्व्हिस कमिशन इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीतील (एक्झिक्युटिव्ह ब्रँच) व्हेकन्सीची होती. त्याची भरती प्रक्रिया जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. दुसरी नोटीस शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या जनरल सर्व्हिससह इतर एंट्रीसाठी होती, ज्याची भरती प्रक्रिया जून 2023 मध्ये सुरू होणार आहे.

या स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला Navy Job मिळवायचा असेल तर नवीन माहितीसाठी नेव्हीची वेबसाइट joinindiannavy.gov.inला भेट द्या. भरती प्रक्रिया आणि नवीन रिक्रुटमेंटबद्दल सर्व माहितीची नोटिफिकेशन्स इथंच अपलोड केली जातील. भरती प्रक्रियेला सध्या वेळ असल्याने अद्याप या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

First published:

Tags: Career, Career opportunities, Indian navy, Job, Women empowerment