जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / IAF अग्निवीरांना किती मिळेल सॅलरी? किती मिळेल सुट्या? इथे मिळेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

IAF अग्निवीरांना किती मिळेल सॅलरी? किती मिळेल सुट्या? इथे मिळेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

IAF अग्निवीरांना किती मिळेल सॅलरी? किती मिळेल सुट्या? इथे मिळेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

भारतीय हवाई दलात अग्निवीर वायूची भरती चार वर्षांसाठी असेल. चार वर्षांनी सेवानिवृत्ती देऊन काहींना दिलासा मिळणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 नोव्हेंबर: भारतीय हवाई दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे आणि सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न असेल तर ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे. भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेंतर्गत 12वी पाससाठी अग्निवीर वायु भरती 2023 साठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अग्निवीर वायु भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज 23 नोव्हेंबरपर्यंत हवाई दलाच्या वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर भेट देऊन करता येतील. भारतीय हवाई दलात अग्निवीर वायूची भरती चार वर्षांसाठी असेल. चार वर्षांनी सेवानिवृत्ती देऊन काहींना दिलासा मिळणार आहे. अग्निवीर वायु यांना पदमुक्त झाल्यानंतर केंद्रीय सशस्त्र दल, राज्य पोलिसांसह इतर नोकऱ्यांमध्ये सूट मिळेल. आज आम्ही तुम्हाला अग्निवीर वायुचा पगार, सुट्या यासह सर्व सुविधांबद्दल सांगणार आहोत. Maharashtra Police Bharti: 90 मिनिटांत ठरणार तरुणांचं भविष्य; 18,000 पदांसाठी असं असेल परीक्षेचं पॅटर्न अग्निवीर वायुची नोकरी किती वर्षांची असेल? वायुसेना कायदा 1950 अंतर्गत, भारतीय हवाई दलात अग्निवीर वायुची भरती 4 वर्षांसाठी असेल. चारनंतर 25 टक्के अग्निवीरांची हवाई दलाच्या नियमित केडरमध्ये भरती केली जाईल. IAF च्या अग्निवीर वायुला किती सुट्टी मिळेल? वार्षिक रजा- अग्निवीर वायुला दरवर्षी ३० सुट्या मिळतील. वैद्यकीय रजा- वैद्यकीय सल्ल्यानुसार. अग्निवीर वायुला वैद्यकीय आणि CSD सुविधा मिळतील का? अग्निवीरवायूच्या सेवेदरम्यान, हवाई दल सेवा रुग्णालयात वैद्यकीय सुविधा आणि CSD सुविधा प्रदान करेल. MPSC Recruitment: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी घोषणा; अधिकारी पदांच्या 1-2 नव्हे 623 जागांसाठी भरती; करा अर्ज अग्निवीरवायूला किती पगार मिळेल? अग्निवीरवायूला पहिल्या वर्षी 30 हजार पगार मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी 33000 रुपये, तिसऱ्या वर्षी 36500 रुपये आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये मिळतील. वेतन खंड खालीलप्रमाणे असेल- अग्निवीर वायुचा विमा उतरवला जाईल का? अग्निवीर वायुचा 48 लाखांचा जीवन विमा असेल. अधिकारी ते शिपाई पदापर्यंत राज्यातील ‘या’ बँकेत बंपर ओपनिंग्स; अर्जासाठी अवघे काही दिवस शिल्लक चार वर्षांनंतर अग्निवीर वायुला कोणते प्रमाणपत्र मिळणार? अग्निवीर वायुला चार वर्षांनंतर कौशल्य प्रमाणपत्र मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात