मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Teacher Recruitment 2021: शिक्षकांनो, परीक्षा न देता मिळणार नोकरी; या लिंकवर आताच करा अप्लाय

Teacher Recruitment 2021: शिक्षकांनो, परीक्षा न देता मिळणार नोकरी; या लिंकवर आताच करा अप्लाय

उमेदवारांची निवड (ISPAT Recruitment 2021) कोणत्याही परीक्षेशिवाय केवळ मुलाखतीद्वारे केली जाईल.

उमेदवारांची निवड (ISPAT Recruitment 2021) कोणत्याही परीक्षेशिवाय केवळ मुलाखतीद्वारे केली जाईल.

उमेदवारांची निवड (ISPAT Recruitment 2021) कोणत्याही परीक्षेशिवाय केवळ मुलाखतीद्वारे केली जाईल.

मुंबई, 22 नोव्हेंबर: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने (Steel Authority Of India Limited) विविध शिक्षक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांवरील उमेदवारांची निवड (ISPAT Recruitment 2021) कोणत्याही परीक्षेशिवाय केवळ मुलाखतीद्वारे केली जाईल. एकूण 38 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वरिष्ठ स्तर, TGT आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षक (Teacher Recruitment 2021) पदांवर भरती केली जाणार आहे.

ही पात्रता आवश्यक

या (Teacher Recruitment 2021) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे B.Ed सोबतच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. तर संगीत आणि शारीरिक शिक्षण या पदासाठी उमेदवाराने संबंधित विषयातील पदवीधर असणे आवश्यक आहे. अधिक शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

वयोमर्यादा

या पदांसाठी उमेदवाराचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अशा पद्धतीनं होणार निवड

मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवार त्यांच्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह अधिसूचनेसह जारी केलेला अर्ज भरून नियोजित तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.

Indian Army Recruitment 2021: विना परीक्षा लष्कर अधिकारी होऊन देशसेवेचे संधी

काही महत्त्वाच्या तारखा

मुलाखतीची तारीख – 1 डिसेंबर 2021

वेळ - सकाळी 9.00 वाजता

मुलाखतीचे स्थळ - मिनी ऑडिटोरियम, एचआरडी सेंटर, बीएसएल (इस्पात भवन समोर) बोकारो स्टील सिटी, झारखंड- 827001

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, जॉब