मराठी बातम्या /बातम्या /करिअर /BREAKING: ठरलेल्या तारखेलाच होणार दहावी आणि बारावीच्या परीक्षा- सूत्र

BREAKING: ठरलेल्या तारखेलाच होणार दहावी आणि बारावीच्या परीक्षा- सूत्र

दहावी आणि बारावीच्या (10th and 12th Exam) परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार आहेत. गेल्या काही दिवसात या मुद्द्यावर अनेक चर्चा झडत होत्या. अखेर आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 09 एप्रिल: दहावी आणि बारावीच्या (10th and 12th Exam) परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार आहेत. गेल्या काही दिवसात या मुद्द्यावर अनेक चर्चा झडत होत्या. मात्र आता ठरल्या तारखेलाच (Maharashtra Board Exam) परीक्षा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिक्षणमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत याबाबत चर्चा सुरू आहे. 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 29 एप्रिल रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होते आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 16 लाख विद्यार्थी बसणार आहेत. तर बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थी बसणार आहेत, बारावीची परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षासाठी यंत्रणा उभी करणं सहज शक्य नाही आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य होणार नाही, ही यंत्रणा उभी करण्यासाठी 2 वर्ष लागतील असा अभिप्राय आयटी कंपन्यांनी दिली आहे. शिक्षणमंत्र्यांनी गुरुवारी यासंदर्भात आयटी कंपन्यांसाठी चर्चा केली, त्यावेळी त्यांनी असा अभिप्राय दिला आहे. त्यामुळे परीक्षा या ऑफलाइनच होणार हे जवळपास राज्य सरकारने निश्चित केले आहे.

(हे वाचा-राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना फोन, MPSC च्या परीक्षेबाबत केली महत्त्वपूर्ण मागणी)

न्यूज18 लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा तयारी बाबत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींसोबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आज चर्चा करत आहेत. परीक्षेसंदर्भात आणखी काय उपाययोजना आखल्या जाव्यात याबाबत ही चर्चा सुरू आहे. दरम्यान परीक्षा पुढे ढकलू नका अशी मागणी ग्रामीण भागातल्या लोकप्रतिनिधींनी केली आहे.  या बैठकीत परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी  एसओपी (Standard operating procedure SOP) जारी करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांकडून हा प्रश्न विचारला जात आहे की परीक्षा ऑफलाइन होणार की ऑनलाइन? आता या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षाही या महिन्यात सुरू होत आहेत. ही परीक्षा रद्द करून नवी तारीख द्यावी, अशी मागणी देखील काहीजणं करत होते. मात्र आता एसओपी देखील जारी करण्यात आल्याने ही परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Exam, Varsha gaikwad