जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JEE Advanced 2022: विद्यार्थ्यांनो, पात्रतेपासून तर काही महत्त्वाच्या तारखांपर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती; जाणून घ्या

JEE Advanced 2022: विद्यार्थ्यांनो, पात्रतेपासून तर काही महत्त्वाच्या तारखांपर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती; जाणून घ्या

उद्याच जाहीर होणार JEE Advanced Result

उद्याच जाहीर होणार JEE Advanced Result

आज आम्ही तुम्हाला यंदा होणाऱ्या JEE परीक्षेच्या तारखांबद्दल आणि पात्रतेबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 एप्रिल: दरवर्षी लाखो विद्यार्थी JEE Mains परीक्षा (JEE Mains Exam 2022) देतात. बारावीनंतर कोणत्याही टेक्निकल आणि इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेश (How to get admission in Engineering) मिळवण्यासाठी या परीक्षेचे मार्क्स महत्त्वाचे असतात. म्हणूनच अनेक विद्यार्थी यासाठी प्रचंड मेहनत करत असतात. आपल्यालाच चांगलं कॉलेज मिळावं यासाठी प्रत्येक विषयाचा जीवतोड अभ्यास करत असतात. यंदा ही परीक्षा लवकरच होणार आहे. मात्र या परीक्षेनंतर JEE Advanced 2022 ही परीक्षा घेतली जाणार आहे. जे विद्यार्थी Mains परीक्षा उत्तीर्ण होतील सहा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. आज आम्ही तुम्हाला यंदा होणाऱ्या JEE JEE Advanced परीक्षेच्या तारखांबद्दल आणि पात्रतेबद्दल माहिती परीक्षेच्या तारखांबद्दल आणि पात्रतेबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. JEE Exam Tips: परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक; अशा पद्धतीनं करा अभ्यास; Crack होईल परीक्षा हे आहेत पात्रतेचे निकष विद्यार्थ्यांनी जेईई (मुख्य) 2022 मध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. JEE (मुख्य) 2022 च्या BE/BTech पेपरमध्ये उमेदवार टॉप 2,50,000 यशस्वी उमेदवारांमध्ये (सर्व श्रेणींसह) असणे आवश्यक आहे. उमेदवारांचा जन्म 1 ऑक्टोबर 1997 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. SC, ST आणि PWD उमेदवारांना पाच वर्षांची सूट दिली जाते. या उमेदवारांचा जन्म 1 ऑक्टोबर 1992 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. उमेदवार सलग दोन वर्षांत जास्तीत जास्त दोनदा JEE (Advanced) देऊ शकतो. उमेदवारांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी 2021 किंवा 2022 मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांसह 12वी उत्तीर्ण केलेली असावी. ज्या उमेदवारांचे IIT मधील प्रवेश कोणत्याही IIT मध्ये (कोणत्याही कारणामुळे) प्रवेश घेतल्यानंतर रद्द करण्यात आले होते ते देखील JEE (Advanced) 2022 ला बसण्यास पात्र नाहीत. कधी होईल परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार, JEE Advanced 2022 ची परीक्षा 28 ऑगस्ट 2022 रोजी घेतली जाईल. JEE Advanced 2022 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 ऑगस्टपासून सुरू होईल. JEE Advanced 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट आहे. परीक्षेत तीन तास कालावधीचे दोन पेपर (पेपर 1 आणि पेपर 2) असतील. दोन्ही पेपरमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक आहे. पेपर 1 सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत असेल तर पेपर 2 हा दुपारी 2:30 ते 5:30 पर्यंत असेल. तुम्हीही IAS होण्याचं स्वप्नं बघताय? मग UPSC परीक्षेबद्दल ही माहिती असणं आवश्यक

अशा पद्धतीनं करा अर्ज

अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in. वर लॉग इन करा होमपेजवर, “JEE Advanced 2022 – Registration” या लिंकवर क्लिक करा. विहित पद्धतीने अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा. सबमिट वर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात