मुंबई, 06 जून: देशात आणि जगात असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना गणिताची प्रचंड भीती वाटते. म्हणूनच अशा विद्यार्थ्यांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Madras) मद्रास गणित अभ्यासक्रमाद्वारे ‘आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग’ (IIT Madras Out Of The Box Thinking Course) नावाचा एक कोर्स सुरू करणार आहे. ऑनलाइन मोडमध्ये ऑफर केला जाणारा हा कोर्स गणिताच्या समस्या सोडवण्याच्या अनेक पद्धती शिकवण्यावर भर देणार आहे.हा कोर्स भारतात तसेच परदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुला असणार आहे. हा कोर्स IIT Madras Pravartak Technologies Foundation, IIT Madras ची sec 8 कंपनी मार्फत ऑनलाइन पद्धतीने मोफत दिला जाणार आहे, जो नाममात्र शुल्कात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रेड प्रमाणपत्र देखील जारी करणार आहे. अंतिम परीक्षा भारतभरातील निवडक शहरांमधील केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी प्राॅक्टिकल परीक्षा असेल, अशी माहिती संस्थेने दिली आहे. या कोर्सद्वारे कार्यरत व्यावसायिक आणि संशोधकांसह सुमारे दहा लाख शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या कोर्सद्वारे अभ्यासक्रमांचे चार दर्जेदार स्वतंत्र स्तर विद्यार्थी, व्यावसायिक आणि संशोधकांना सहज उपलब्ध असतील. पुणे महानगरपालिकेच्या Internship Program बद्दल ऐकलंत का? 15, 000 रुपये Stipend “हा अभ्यासक्रम भारतातील अशा प्रकारचा पहिलाच अभ्यासक्रम आहे आणि आगामी काळात त्याचा मोठा प्रभाव पडेल. या कोर्सचे फायदे येत्या काही वर्षात आपण पाहणार आहोत. हा कोर्स मोफत देण्यात येत आहे. या कोर्सचा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, विशेषतः ग्रामीण भारतात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.” असं आयआयटी मद्रासचे संचालक प्रा. व्ही. कामकोटी म्हणाले. काय आहे आउट ऑफ द बॉक्स “‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार म्हणजे अप्रत्यक्ष आणि सर्जनशील दृष्टीकोनातून समस्या सोडवणे, ताबडतोब स्पष्ट नसलेले तर्क वापरणे आणि केवळ पारंपारिक स्टेप बाय स्टेप लॉजिक वापरून मिळवता येणे. या कोर्समध्ये, गणितातील ज्ञात आणि अज्ञात तथ्ये तार्किकदृष्ट्या पुन्हा शोधून ते करण्याच्या पद्धतीबद्दल मनोरंजक व्यापक समज देऊन अशा विचारांवर जोर दिला जाणार आहे" असंही संचालक प्रा. व्ही. कामकोटी म्हणाले. हा कोर्स गणिताचे शिक्षक आणि आर्यभट्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसचे संस्थापक-संचालक सदागोपन राजेश शिकवतील. ते गेली तीस वर्षे शाळा आणि कॉलेज अशा विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये गणित शिकवत आहेत. ते प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे पालनपोषण कार्यक्रम देखील आयोजित करत आहे, त्यांच्यामध्ये समस्या सोडवण्याची आवड निर्माण करत आहे. MYLAP: राज्य सरकारचा HCL कंपनीशी मोठा करार; 20 हजार 12वी पास विद्यार्थ्यांना मिळणार Job आणि Training असं करा रजिस्ट्रेशन IIT मद्रासनुसार या कोर्ससाठी नोंदणी 24 जून, 2022 रोजी बंद होणार आहे. तसंच अभ्यासक्रमाची पहिली बॅच 1 जुलै 2022 रोजी सुरू होणार आहे. इच्छुकांनी https://www.pravartak.org .in/out-of-box-thinking.html लिंकद्वारे नोंदणी करायची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







