मुंबई, 08 एप्रिल: अभियांत्रिकी आणि विज्ञान क्षेत्रात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटी हे सर्वात पसंतीचे ठिकाण आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना या प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण घ्यायचे आहे. पण IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Advanced सारखी कठीण परीक्षा द्यावी लागत असल्याने फार कमी विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश मिळतो. पण आता विद्यार्थ्यांना जेईई न देता आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याची संधी आहे, तीही विज्ञानाची पदवी मिळविण्याची. जर तुम्हीही JEE परीक्षा देऊ इच्छित नसाल आणि तुम्हाला IIT मध्ये प्रवेश हवा असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश; आइन्स्टाईनपेक्षा दुप्पट IQ; हे होते जगातील सर्वात हुशार व्यक्ती अलीकडेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी IIT मद्रासमध्ये एक नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे, ज्याला बॅचलर ऑफ सायन्स इन इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स म्हणतात. हा एक ऑनलाइन कोर्स आहे, ज्याअंतर्गत विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील चार वर्षांची पदवी दिली जाईल. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई द्यावी लागणार नाही. MPSC Recruitment: सरकारी अधिकारी होण्याची सर्वात मोठी संधी; MPSC तर्फे मोठ्या पदभरतीची घोषणा गणित आणि भौतिकशास्त्र घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. पात्रता परीक्षेद्वारे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला जाईल. क्वालिफायर परीक्षेचा अभ्यास आयआयटी मद्रासच्या 4 आठवड्यांच्या शिक्षण सत्राद्वारे देखील केला जाऊ शकतो. अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा नाही. तसेच, जागांची संख्याही निश्चित नाही. त्यांना हवे तितके विद्यार्थी या संधीचा लाभ घेऊ शकतात. IAS ते MBBS तब्बल 20 पदव्या आणि 42 विद्यापीठांमध्ये प्रवेश; भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तीबद्दल ऐकलंय का? या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पात्रता परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाईल. अभ्यासक्रमासाठी जेईईद्वारे देखील प्रवेश घेता येईल.
हा अभ्यासक्रम चार टप्प्यात तयार करण्यात आला आहे. चौथा टप्पा पार केल्यानंतरच विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ सायन्सची पदवी दिली जाईल. या अभ्यासक्रमातील पहिला टप्पा फाउंडेशनचा, दुसरा टप्पा डिप्लोमा आणि तिसरा टप्पा डेटा प्रोग्रामिंगचा आहे. तर चौथा टप्पा पूर्ण केल्यानंतरच विद्यार्थ्यांना पदवी दिली जाईल.